Statue Of Equality: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चं उद्घाटन; पवित्र मंत्रोच्चारात अतिभव्य मूर्तीचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 'स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी'चं लोकार्पण करण्यात आलं. पवित्र मंत्रोच्चाराच्या स्वरात मोदींच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं. सोनं, चांदी, पितळ, तांबे आणि जस्त या शुद्ध पंचधातूने तयार करण्यात आलेल्या या स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचं लोकार्पण करण्यात आलं आहे.
हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं (Statue Of Equality) लोकार्पण करण्यात आलं. पवित्र मंत्रोच्चाराच्या स्वरात मोदींच्या हस्ते संत रामानुजाचार्य (Sant Ramanujacharya) यांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं. सोनं, चांदी, पितळ, तांबे आणि जस्त या शुद्ध पंचधातूने तयार करण्यात आलेल्या या स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचं लोकार्पण करण्यात आलं आहे. 200 एकरहून अधिक परिसरात हा पुतळा वसविण्यात आला आहे. पुतळ्याचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून संत रामानुजाचार्य यांना अभिवादन केलं. यावेळी साधूसंत आणि मोजकेच पाहूणे उपस्थित होते. रामानुजाचार्य स्वामींचं हे एक हजारावं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांची जगातील दुसरी भव्य मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचं लोकार्पण करण्यापूर्वी पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी पूजाऱ्यांनी मंत्रोच्चार केला. तब्बल 15 मिनिटे ही पूजा चालली. त्यानंतर मोदींनी या संपूर्ण मंदिराची पाहणी केली. यावेळी मोदींनी 108 दिव्य देशम (मंदिर)ची पाहणी केली. चिन्ना जीयर स्वामी यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे संपूर्ण मंदिर दाखवू त्याची माहिती दिली. त्यानंतर मदी एका प्रशस्त हॉलसमध्ये पोहोचले. या प्रशस्त हॉलमधील प्रत्येक खांबांवर रामानुजाचार्यांचा जीवनकाळ चितारण्यात आलेला आहे. राजस्थानच्या विशेष कारागिरांनी हे खांब तयार केले आहेत. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं.
जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती
रामानुजाचार्य यांची मूर्ती जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे. रामानुजाचार्य स्वामींची ही मूर्ती 216 मीटर उंचीची आहे. रामानुजाचार्य यांनी आस्था, जाती आणि पंथरहीत समानतेचा विचार मांडला होता. ही मूर्ती पंचधातूची बनलेली आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्तपासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. बैठ्या अवस्थेतील ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. 54 फूट उंच आधार भवनावर ही मूर्ती बांधण्यात आली असून या मूर्तीला ‘भद्र वेदी’ हे नाव देण्यात आलं आहे. या मूर्तीच्या भोवती 108 दिव्य देशम (मंदिरे) निर्माण करण्यात आलेले आहेत. या मेगा प्रकल्पावर 1 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही मूर्ती बनवण्यासाठी 1800 टन पंचधातूंचा उपयोग करण्यात आला आहे.
Narendra Modi in Hyderabad LIVE : रामानुजाचार्य यांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात, पंतप्रधानांच्या हस्ते पुजाhttps://t.co/XfqbTkmu9b#hyderabad #NarendraModi #pmmodi #primeministerofindia #StatueofEquality
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2022
संबंधित बातम्या: