PM Modi Ayodhya Visit : न भूतो न भविष्यति… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगारोड शो; अयोध्येत येताच मोठी गिफ्ट काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मोदी अयोध्या विमानतळावर उतरताच हजारो लोकांनी एकाच वेळी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर मोदींचा रोड शो सुरू झाला. अयोध्या विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत हा रोड शो सुरू होता. हजारो लोकं या रोड शोमध्ये सामील झाले होते. मोदींवर फुलांची उधळण होत होती. मोदी मोदीचा जयघोष आसमंतात घुमत होता. जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता.

PM Modi Ayodhya Visit : न भूतो न भविष्यति... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगारोड शो; अयोध्येत येताच मोठी गिफ्ट काय?
narendra modiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 10:51 AM

अयोध्या | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आलं. अयोध्या विमानतळावर मोदी उतरताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत मोदींचा मेगा रोड शो सुरू झाला. न भूतो न भविष्यति असा हा मेगा रोड शो होता. या मेगा रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. तसेच नव्या ट्रेनला हिरवा कंदील दाखवून जनतेला मोठं गिफ्ट दिलं.

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आले. मोदी यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी येताच मोदी मोदीच्या घोषणांनी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा रोड शो सुरू झाला.

मेगा रोड शो, हजारो नागरिक…

अयोध्या विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत हा रोड शो सुरू होता. हजारो लोकं या रोड शोमध्ये सामील झाले होते. मोदींवर फुलांची उधळण होत होती. मोदी मोदीचा जयघोष आसमंतात घुमत होता. जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. हजारो हात उंचावत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या उंचावलेल्या हाताना हात उंचावून अभिवादन करत होते. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या रस्त्या रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शस्त्रधारी सैनिकही प्रत्येकावर करडी नजर ठेवून होता.

फुलांची उधळण आणि…

फुलांची उधळण आणि नागरिकांचं अभिवादन स्वीकारतच मोदींचा ताफा अयोध्या धाम रेल्वे स्थानकात आला. यावेळी मोदी यांच्या हस्ते अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मोदी यांनी सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत या दोन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते.

16 हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

त्यानंतर मोदी यांनी एकट्या अयोध्येसाठी 16 हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. यावेळी मोदी यांच्या हस्ते चार पुनर्विकसित रस्त्यांचं उद्घाटन केलं. रामपथ, भक्तीपथ, धर्मपथ आणि श्री राम जन्मभूमी पथाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

एकूण 40 स्टेज

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शोनंतर जनसभेला संबोधित करणार आहेत. सभा स्थळी देशभरातील कलाकारांकडून स्वागत करण्यात येणार आहे. एअरपोर्ट पासून रेल्वे स्थानक आणि राम पथ मार्गापर्यंत एकूण 40 स्टेज उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी देशभरातील 1400 हून अधिक कलाकार लोक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.