Mann ki Baat: पंतप्रधान मोदींकडून कौतूक, जाणून घ्या झारखंडमधील अ‍ॅलोवेरा व्हिलेजबद्दल

रांचीजवळील देवरी गावातील महिलांनी मंजू कच्छप जी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून कोरफड लागवडीचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी कोरफडीची लागवड सुरू केली. या शेतीचा केवळ आरोग्य क्षेत्रात फायदा झाला नाही, तर या महिलांचे उत्पन्नही वाढले. | aloevera village

Mann ki Baat:  पंतप्रधान मोदींकडून कौतूक, जाणून घ्या झारखंडमधील अ‍ॅलोवेरा व्हिलेजबद्दल
अ‍ॅलोवेरा व्हिलेज
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 1:00 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात झारखंडमधील एका गावाविषयी कौतुकोद्गार काढले. त्यामुळे झारखंडमधील देवरी हे गाव अचानक प्रकाशझोतात आले आहे. अ‍ॅलोवेरा व्हिलेज या टोपणनावाने ओळखले जाणारे देवरी हे गाव रांचीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये या गावाची यशोगाथा कथन केली. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, सध्या आपल्याला सर्वत्र कोरोनाविषयी ऐकायला मिळत आहे. शंभर वर्षातील सर्वात मोठा साथीचा रोग असलेल्या कोरोनाने आपल्या बरेच काही शिकवले आहे. मात्र, त्यामुळे हेल्थकेअर आणि वेलनेस या क्षेत्राविषयीची लोकांची जागरुकता वाढल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

भारतात नैसर्गिक उत्पादने मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, जी निरोगीपणासाठी खूप फायदेशीर आहेत. यासाठी त्यांनी देवरी गावातील कोरफडीच्या शेतीचे उदाहरण दिले. रांचीजवळील देवरी गावातील महिलांनी मंजू कच्छप जी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून कोरफड लागवडीचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी कोरफडीची लागवड सुरू केली. या शेतीचा केवळ आरोग्य क्षेत्रात फायदा झाला नाही, तर या महिलांचे उत्पन्नही वाढले. कोविड -19 साथीच्या काळातही त्याने चांगले उत्पन्न मिळवले. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्या थेट त्यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. आज सुमारे 40 महिलांची टीम या कामात सामील आहे आणि कोरफडीची लागवड अनेक एकरांमध्ये केली जाते.

कोरफडीच्या शेतीमुळे गावकऱ्यांना फायदा

डिसेंबर 2018 मध्ये, भारतीय कृषी संशोधन परिषद, ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) आणि बिरसा कृषी विद्यापीठाने आदिवासी उपयोजने अंतर्गत देवरी गावात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर कोरफडीच्या लागवडीसाठी या परिसराची निवड करण्यात आली. तेव्हापासून हे गाव अ‍ॅलोवेरा व्हिलेज म्हणून ओळखले जाऊ लागले. गावातील बहुतांश महिलांनी कोरफडीच्या लागवडीमध्ये रस दाखवला. काही वर्षातच या गावाची चर्चा झारखंडमध्येच नव्हे तर देशपातळीवर होऊ लागली.

देवरी पंचायतीच्या प्रमुख मंजू कच्छप स्वत: देखील कोरफडची शेती करतात. उन्हाळ्यात काही दिवसांच्या अंतराने सिंचन आवश्यक असते, तर इतर हंगामात कोरफडीला पाण्याची विशेष गरज नसते. कोरफडीच्या लागवडीसाठी इतर कोणताही विशेष खर्च होत नाही. बाजारात कोरफडीची रोपं सहज उपलब्ध असतात. मात्र, गावात कोरफडीवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची स्थापना झाली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी वाढेल, असे मंजू कच्छप यांनी सांगितले.

औषधी गुणांमुळे कोरफडीला मागणी

कोरफडीत अनेक औषधी गुण असतात. कावीळसह इतर अनेक आजारांवर कोरफडीचा वापर केला जातो. याशिवाय सौंदर्यप्रसाधने, फेस वॉश, साबण बनवण्यासह इतर कामांमध्ये कोरफड वापरली जाते. मोठ्या शहरांतील लोक आता कोरफडीचा वापर पेय म्हणून देखील करत आहेत. या गुणांमुळे, रांची आणि आसपासचे लोक मोठ्या संख्येने कोरफड पाने खरेदी करण्यासाठी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करणार आणखी 2000 रुपये; जाणून घ्या सर्वकाही

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेतमालाच्या साठवणुकीसाठी आता घरीच उभारता येणार सौरउर्जेवर चालणारे कोल्ड स्टोरेज युनिट

शेतकऱ्यांनो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा अन् रब्बीचे बियाणे मिळवा, हरभऱ्यावर अधिकचा भर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.