Martyrs Day : बापूंचे विचार आणि आदर्श लोकप्रिय करणं हाच सामुदायिक प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथील राजघाटावर जाऊन आदरांजली अर्पण केली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथील राजघाटावर जाऊन आदरांजली अर्पण केली. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर फुलं अर्पण करून आदरांजली वाहिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयनं नरेंद्र मोदी यांचे फोटो शेअर केले आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी पाच वाजता बिर्ला हाऊसला (Birla House) जाणार असून तिथे भजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बिरला हाऊसमध्ये आजच्याच दिवशी 1948 मध्ये नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिवस म्हणून देखील साजरी केली जाते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं.
नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधी यांचे विचार लोकप्रिय करण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त एक ट्विट केलं आहे. महात्मा गांधींचे विचार लोकप्रिय बनवण्याचा आमचा सामूहिक प्रयत्न आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांचे आदर्श आणि विचारांना लोकप्रिय करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. हुतात्मा दिनाच्या दिवशी मी या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन करतो, त्यांच्या सेवा आणि धैर्याचं कायमच स्मरण केले जाईल, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Delhi | Prime Minister Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat on his death anniversary pic.twitter.com/u4oTZLWKgk
— ANI (@ANI) January 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त राजघाट येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपतींनी आदरांजली वाहिल्याचे फोटो देखील एनएनआयनं शेअर केले आहेत.
Remembering Bapu on his Punya Tithi. It is our collective endeavour to further popularise his noble ideals.
Today, on Martyrs’ Day, paying homage to all the greats who courageously safeguarded our nation. Their service and bravery will always be remembered.
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2022
पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशिवाय इतर मोठे मंत्री देखील महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते.
Delhi | President Ram Nath Kovind lays a wreath at Rajghat as the nation observes the death anniversary of #MahatmaGandhi pic.twitter.com/9XVB1ZuArf
— ANI (@ANI) January 30, 2022
अमित शहा यांच्याकडून अभिवादन
गृहमंत्री अमित शहा यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विट केलं आहे. महात्मा गांधी यांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्वदेशी, स्वभाषा आणि स्वराज्याची प्रेरणा जागवली. त्यांचे विचार आणि आदर्श कायम सेवेसाठी प्रेरित करत राहतील, असं म्हणत अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
महात्मा गांधी जी ने हर भारतीय के हृदय में स्वदेशी, स्वभाषा और स्वराज की अलख जगाई। उनके विचार और आदर्श सदैव हर भारतवासी को राष्ट्रसेवा के लिए प्रेरित करते रहेंगे।
आज पूज्य बापू की पुण्यतिथि पर उन्हें नमन कर श्रद्धांजलि देता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) January 30, 2022
प्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात 30 जानेवारी हा दिवस आपल्याला त्यांच्या आदर्शांची आठवण करून देतो, असं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी आपण प्रजासत्ताक दिन देखील साजरा केला. त्यामध्ये भारताच्या शौर्याचा आणि सामर्थ्याचं जे दर्शन घडलं त्यामुळे आपल्या सर्वांचा उत्साह वाढला असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
त्या दिवशी काय घडलं?
30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी होते. सायंकाळी पाच वाजता सुमारास महात्मा गांधी प्रार्थनेसाठी बाहेर निघाले त्यावेळी ते नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींवर गोळीबार केला. त्यानं तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी दोन गोळ्या महात्मा गांधींच्या शरीरातून आर पार करून गेल्या. एक गोळी महात्मा गांधींच्या शरीरात होती. गोळीबार झाला त्या ठिकाणीच महात्मा गांधींचे निधन झाले.
इतर बातम्या:
Jasprit bumrah: जसप्रीत बुमराहला घडवणारे कोचच म्हणतात, त्याला कॅप्टन बनवू नका, कारण….
PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat on his 74 death anniversary