‘विकासविरोधी असल्याचं काँग्रेसनं दाखवून दिलं’, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर भाजपाध्यक्षांचा घणाघात
पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी आपल्या दौरा रद्द केला आणि ते पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. या प्रकारानंतर पंतप्रधान मोदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज पंजाब (Punjab) दौऱ्यावर होते. यावेळी ते विविध विकासकामाचं उद्घाटन करणार होते. मात्र, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी आपल्या दौरा रद्द केला आणि ते पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. या प्रकारानंतर पंतप्रधान मोदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाब सरकारवर जोरदार टीका करत काँग्रेसवर हल्ला चढवलाय.
‘पंजाब सरकारने दाखवून दिलं की ते विकासविरोधी आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती. हे खूप चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे सुपुत्र सरदार भगतसिंह आणि अन्य शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार होते. सोबतच राज्यातील प्रमुख विकासकामांचं भूमिपूजन ते करणार होते’.
अपनी निकृष्ट सोच और ओछी हरकतों से पंजाब की कांग्रेस सरकार ने दिखा दिया है कि वह विकास विरोधी है और हमारे स्वतंत्रता सेनानियों के लिए भी उनके दिल में कोई सम्मान नहीं है। यह घटना माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी की सुरक्षा में एक बहुत बड़ी चूक थी। यह बेहद चिंताजनक है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
पंजाब की कांग्रेस सरकार ने ऐसा करने में इस बात की भी परवाह नहीं की कि देश के प्रधानमंत्री @narendramodi जी को देश के महान सपूत सरदार भगत सिंह और अन्य शहीदों को श्रद्धांजलि देनी थी और राज्य में प्रमुख विकास कार्यों की आधारशिला रखनी थी।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
पंजाबमधील काँग्रेस सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भीतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम होऊ न देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली, असा गंभीर आरोप नड्डा यांनी आपल्या ट्वीटद्वारे केलाय.
पंजाब की कांग्रेस सरकार ने आगामी विधान सभा चुनाव में जनता के हाथों करारी हार के डर से पंजाब में देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के कार्यक्रमों को विफल करने के लिए हर संभव कोशिश की।प्रधानमंत्री की सुरक्षा से खिलवाड़ किया गया।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?
पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.
इतर बातम्या :