AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनमोहन सिंगानी जे सांगितलं तेच करतोय, तुम्हाला अभिमान वाटायला हवा; मोदींचा काँग्रेसवर पलटवार

कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. (PM narendra Modi Quotes Manmohan Singh In 'Congress U-Turn' Charge Over Farm Laws)

मनमोहन सिंगानी जे सांगितलं तेच करतोय, तुम्हाला अभिमान वाटायला हवा; मोदींचा काँग्रेसवर पलटवार
नरेंद्र मोदी
| Updated on: Feb 08, 2021 | 12:55 PM
Share

नवी दिल्ली: कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकच कृषी उत्पन्न बाजार समिती असावी असा आग्रह धरला होता. आम्ही ते करून दाखवलं आहे. मनमोहन सिंगांनी जे सांगितलं तेच आम्ही करतोय. त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायला हवा, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (PM narendra Modi Quotes Manmohan Singh In ‘Congress U-Turn’ Charge Over Farm Laws)

कृषी कायद्याचं समर्थन करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान असतानाच्या भाषणातील काही मुद्देच वाचून दाखवले. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करण्याचं स्वातंत्र्य देण्याचं आणि त्यासाठी एकच कृषी बाजार निर्माण करण्याचा मनोदय मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला होता. आम्ही दुसरे काय करतोय. तेच तर करत आहोत. जे मनमोहन सिंगानी सांगितलं तेच मोदी करत आहेत म्हणून तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

घाई तर लग्नाकार्यातही होतेच

आता कायदा लागू करण्यापूर्वी आम्हाला विचारात घेतलं नाही असं सांगितलं जात आहे. घाईघाईत कायदा लागू केल्याचं म्हटलं जात आहे. असं तर घरातील लग्नकार्यातही होतंच असतं. आम्हाला विचारलं नाही म्हणून काका, मावसाही नाराज होतातच ना, असा टोलाही त्यांनी लगावला.

श्रेय तुम्ही घ्या, शिव्या माझ्या खात्यात जमा करा

आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. कोणताही तणाव नाही. फक्त शेतकऱ्यांनी बुजुर्गांना घरी पाठवलं पाहिजे, असं सांगतानाच आता शेतीत मोठी सुधारणा झाली पाहिजे. आज जे मी केलं, ते उद्या कुणाला तरी करावंच लागलं असतं. हवं तर तुम्ही त्याचं श्रेय घ्या. शिव्या माझ्या खात्यात येऊ द्या, पण नव निर्माण करण्यासाठी आपण काही केलं पाहिजे, त्यासाठी पुढे या असं आवाहनही त्यांनी केलं.

एमएसपी अधिक सक्षम होईल

सुधारणांना एक संधी दिली पाहिजे. काही चुका असतील तर दुरुस्त करू. विश्वास ठेवा. बाजार समित्या, आडत्या अधिक समक्षम होतील. एमएसपी आहे. एमएसपी होता आणि एमएसपी राहील, असं जाहीरपणे सांगतानाच स्वस्त रेशन देण्याचं कामही सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (PM narendra Modi Quotes Manmohan Singh In ‘Congress U-Turn’ Charge Over Farm Laws)

संबंधित बातम्या:

‘अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है’; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद!

Narendra Modi Parliament Speech | भाषण संसदेत, डोळा बंगालच्या मतांवर? नरेंद्र मोदी यांच्या भाषणात बंगाल

PM Narendra Modi Live : MSP होता, आहे आणि राहील, ग्वाही देतोय : पंतप्रधान

(PM narendra Modi Quotes Manmohan Singh In ‘Congress U-Turn’ Charge Over Farm Laws)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.