नरेंद्र मोदी आज करणार नव्या संसद भवनाचं भूमिपूजन, पाहा काय आहे वैशिष्ट्ये आणि विस्तार

नवीन संसद भवनात लोकसभेचा आकार आता असलेल्या सभागृहाच्या तुलनेने तीन पटीने जास्त आहे. इतकंच नाही तर राज्यसभेचा आकारही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी आज करणार नव्या संसद भवनाचं भूमिपूजन, पाहा काय आहे वैशिष्ट्ये आणि विस्तार
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 6:54 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी म्हणजेच आज नवीन संसद भवनाचं भूमिपूजन (New Parliament House Bhoomi Pujan) करणार आहेत. या नव्या संसद भवनात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अधिवेशन आयोजित करता यावा यासाठी ऑक्टोबर 2022 पर्यंत इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्याची सरकारची तयारी आहे. नवीन संसद भवनात लोकसभेचा आकार आता असलेल्या सभागृहाच्या तुलनेने तीन पटीने जास्त आहे. इतकंच नाही तर राज्यसभेचा आकारही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. (pm narendra modi will lay foundation stone of new parliament building on 10th december today)

टाटा प्रोजेक्ट्स लि. करणार बांधकाम इमारतीचं बांधकाम

टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडून एकूण 64,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये नवीन संसदेची इमारत बांधली जाणार आहे. नवीन संसद भवनाची रचना एचसीपी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसदेची इमारत ही नव्या भारताच्या गरजा आणि आकांक्षानुसार असणार आहे. पुढील 100 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन ही इमारत तयार केली जाणार आहे. जेणेकरुन भविष्यात खासदारांची संख्या वाढली तरी कोणतीही अडचण उद्भवणार नाही.

नव्या संसदभवनाची वैशिष्ट्ये

1. नवे संसदभवन गोल नव्हे त्रिकोणी आकाराचे

2. संसदभवन स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी अर्थात ऑगस्ट 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण

3. संसद भवनाला 861.90 कोटी रुपयांचा खर्च

4. केंद्रीय सचिवालय 2024 पर्यंत तयार होणार

5. लोकसभा-राज्यसभेतील रचना महाराष्ट्र विधानसभेसारखी

6. 64,500 स्क्वे.मी. अंतरावर असेल संसदभवन

7. बांधकामात 2 हजार प्रत्यक्ष, 9 हजार अप्रत्यक्ष कारागिर

9. एकूण 1,272 खासदार एकाच वेळी बसण्याची क्षमता

10. लोकसभेत 888 व राज्यसभेत 384 खासदार बसू शकणार

11. नव्या संसदेत सध्यापेक्षा 488 जादा खासदार बसू शकणार

12. नव्या संसदभवन परिसरात प्रत्येक खासदाराचे कार्यालय

सेंट्रल विस्ताची वैशिष्ठ्ये

1. एकूण बांधकाम 18.37 स्क्वे.कि.मी. भागात

2. सेंट्रल विस्ता प्रोजेक्टचा एकूण खर्च 11,794 कोटी रुपये

3. किमान 6 वर्षे काम चालत राहील

4. सेंट्रल विस्ताममध्ये एकूण 14 इमारती असतील

सेंट्रल विस्ता प्रोजेक्टमध्ये काय काय ?

1. एकूण 14 इमारती

2. संसद भवन

3. केंद्रीय सचिवालय

4. विविध खात्यांची कार्यालये

5. विविध खात्यांचे केंद्रीय विभाग

6. कॉन्फरन्स सेंटर

सध्याची संसदभवन कशी ?

– 12 फेब्रुवारी 1921 रोजी बांधकाम

– 18 जानेवारी 1927 रोजी बांधकाम पूर्ण

– व्हा.लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते उद्घाटन

– बांधकामासाठी 83 लाख रुपये खर्च

– नव्या संसदभवनासाठी लागणार 861 कोटी

– जुनी संसदभवन विविध कार्यक्रमांसाठी वापरणार (pm narendra modi will lay foundation stone of new parliament building on 10th december today)

इतर बातम्या –

पाकिस्तानातील गोंधळ वाढला, इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सामूहिक राजीनामे देणार

सोनिया गांधी: आव्हान पेलणाऱ्या नेत्या ते आव्हानांचा सामना करणाऱ्या नेत्या

(pm narendra modi will lay foundation stone of new parliament building on 10th december today)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.