PNB scam: महाघोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार; ब्रिटनने दिली प्रत्यार्पणास मंजुरी
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला अखेर भारतात आणण्यात येणार आहे. (PNB scam: Nirav Modi's Extradition To India Cleared By UK Government)
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला अखेर भारतात आणण्यात येणार आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरवच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताला मोठं यश मिळालं असून नीरववर कारवाई करणं सोपं जाणार आहे. (PNB scam: Nirav Modi’s Extradition To India Cleared By UK Government)
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारतात येणार आहेत. त्यांच्या भारत दौऱ्यापूर्वीच ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पण कागदपत्रांवर सही केली आहे. नीरवच्या प्रत्यार्पणास मंजुरी देण्यात आली असली तरी ब्रिटनच्या कायद्यानुसार नीरवला काही अधिकार आहेत. त्यानुसार तो 14 दिवसात या प्रत्यार्पणाविरोधात कोर्टात याचिका दाखल करू शकतो. यापूर्वी ब्रिटीश गृह सचिवांनी फेब्रुवारी 2019मध्ये घोटाळेबाज विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली होती.
भारतात येण्यापासून वाचू शकतो
नीरव मोदीजवळ आताही तीन पर्याय शिल्लक आहेत. त्या पर्यायांचा वापर करून तो स्वतःला वाचवू शकतो. नीरव मोदी जिल्हा कोर्टाच्या निर्णयाला लंडनच्या उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो. लंडनच्या हायकोर्टातही हरल्यास नीरव मोदीकडे लंडनच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. या दोन पर्यायांशिवाय नीरव मोदीकडे एक तिसरा पर्यायही आहे. तो मानवाधिकारांचं हवाला देऊन या प्रकरणातून वाचू शकतो. जर नीरव मोदीनं मानसिक स्वास्थ्य किंवा मानवाधिकारांच्या कारणांचा आधार घेतला, तर भारताच्या तुरुंगात पर्याप्त सुविधा नाहीत. नीरव मोदी यूकेच्या मानवाधिकार न्यायालयातही जाऊ शकतो. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेला अजून एक ते दोन वर्ष लागू शकतात.
दोन वर्षांपूर्वी अटक
दोन वर्षांपूर्वी नीरव मोदी यांना ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमधून 19 मार्च 2019 रोजी अटक केली होती, त्यानंतर दक्षिण पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहातील तुरुंगात डांबण्यात आले होते. आता कोर्टाचा निर्णय ब्रिटनच्या गृहसचिव प्रीती पटेल यांना पाठविला जाईल, जो या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेतील.
13 हजार कोटी ठकवल्याचा आरोप
नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 570 कोटी रुपयांना ठकवल्याचा आरोप आहे. याबाबत गुन्हा दाखल होण्यापूर्वी तो देशाबाहेर पसार झाला. यानंतर अंमलबजावणी संचलनालय (ED) त्याचे बंगले, महागड्या गाड्या यासर्व गोष्टींवर कारवाई केली होती. ईडीकडून फरार नीरव मोदीच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. तर काही मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार होता. (PNB scam: Nirav Modi’s Extradition To India Cleared By UK Government)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 16 April 2021 https://t.co/M8iEyBu7xV #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2021
संबंधित बातम्या:
नीरव मोदीला मुंबई हायकोर्टाचा दणका, महागड्या गाड्या, घड्याळ आणि चित्रांचा लिलाव
नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा मोठा निर्णय
नीरव मोदी लवकरच ऑर्थर रोड कारागृहात दिसणार; आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
(PNB scam: Nirav Modi’s Extradition To India Cleared By UK Government)