यूपीएससीमधील ‘लखोबा लोखंडे’, नऊ संधी असताना पूजा खेडकरने ‘तो मी नव्हे’ म्हणत 12 वेळा दिली परीक्षा

Pooja khedkar: पूजा खेडकर प्रकरण उजेडात आल्यानंतर सन २००९ ते २०२३ या काळातील आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १५ हजार उमेदवारांच्या डाटा तपासण्यात आला. सर्वांच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली गेली. परंतु अन्य कोणीही नागरी सेवा परीक्षा नियमांचा भंग केला नाही.

यूपीएससीमधील 'लखोबा लोखंडे', नऊ संधी असताना पूजा खेडकरने 'तो मी नव्हे' म्हणत 12 वेळा दिली परीक्षा
पूजा खेडकर
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 12:36 PM

मराठीतील गाजलेल्या नाटकाची आठवण पूजा खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाला करुन दिली. आचार्य अत्रे लिखित यांचे ‘तो मी नव्हेच’ हे नाटक चांगलेच लोकप्रिय ठरले आहे. या नाटकामधून प्रभाकर पणशीकर यांनी ‘लखोबा लोखंडे’ या बदमाशाची भूमिका केली. वेगवेगळे सोंग घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’वर कोर्टात खटला सुरु झाला. त्यावेळी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका तो घेत राहिला. यूपीएससीमध्ये 9 संधी असताना 12 संधी घेणाऱ्या पूजा खेडकर हिने ‘लखोबा लोखंडे’सारखा प्रकार केला. अधिक संधी देण्यासाठी नावे बदलली. 9 वेळा पूजा दिलीपराव खेळकर तर तीन वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरले.

पूजाने वडिलांचे नावसुद्धा बदलले

पूजा खेडकर हिने स्वत:चे नाव नाही तर वडिलांचे नावसुद्धा बदलले. पूजा वडिलांच्या नावात सात वेळा खेडकर दिलीपराव कोडिंबा, दोन वेळा खेडकर दिलीप के तर एक वेळा दिलीप खेडकर आणि एक वेळा दिलीप के खेडकर असे बदल केले. हे सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पूजा खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) रद्द केली आहे. तिला भविष्यात यूपीएससी परीक्षा देत येणार नाही. तिच्या निवडीवर कायमस्वरुपी बंदी घातली आहे.

हे सुद्धा वाचा

यूपीएससी बदलणार एसओपी

पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीचे असणारा एकमेव लूपव्होलचा फायदा पूजा खेडकर हिने घेतला. गेल्या पंधरा वर्षांमध्ये यूपीएससीची फसवणूक करणारी ती एकमेव उमेदवार निघाली. त्यामुळे लोकसेवा आयोगाने आपला एसओपी (Standard operating procedure) अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात कोणी यूपीएससीची या पद्धतीने फसवणूक करु शकणार नाही.

15 वर्षांचा डाटा शोधला तपासला

पूजा खेडकर प्रकरण उजेडात आल्यानंतर सन २००९ ते २०२३ या काळातील आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १५ हजार उमेदवारांच्या डाटा तपासण्यात आला. सर्वांच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली गेली. परंतु अन्य कोणीही नागरी सेवा परीक्षा नियमांचा भंग केला नाही. पूजा खेडकर हिने बनावट माहितीच्या आधारे काही वेळी यूपीएससीची परीक्षा दिली. त्यामुळे यूपीएससी आपली एसओपी अधिक मजबूत करणार आहे.

हे ही वाचा…

आयएएस पूजा खेडकर यांचे निमित्त अन् IAS, IPS ची ही प्रकरणेही चर्चेत, वादात आलेले अधिकारी कोण, कोण?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.