पूजा खेडकर हिचा UPSC शी पंगा, थेट दिल्ली उच्च न्यायालयात…

पूजा खेडकर हिला नोटीस बजावणाऱ्यांना तिने पक्षकार केले आहे. या याचिकेत पूजा खेडकरने यूपीएससी, केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, मुसरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी, पुणे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले आहे.

पूजा खेडकर हिचा  UPSC शी पंगा, थेट दिल्ली उच्च न्यायालयात...
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 4:09 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त ठरलेली प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे आयएएस रद्द केले. त्यानंतर पूजा खेडकर हिचा जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला. सर्व काही विरोधात असून आता पूजा खेडकर यूपीएससी विरोधात उच्च न्यायालयात पोहचली आहे. यूपीएससीने आयएएस उमेदवारी रद्द केल्याच्या विरोधात पूजा खेडकर हिने याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पूजा खेडकर हिला नोटीस बजावणाऱ्यांना तिने पक्षकार केले आहे. या याचिकेत पूजा खेडकरने यूपीएससी, केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, मुसरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी, पुणे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले आहे. त्यामुळे पूजा खे़डकर प्रकरण आता न्यायालयातही चर्चेत येणार आहे.

पूजा खेडकर आणि वाद

पूजा खेडकर हिचे विविध प्रकरण उघड झाले होते. पूजा खेडकर हिचे अपंग प्रमाणपत्र, वडील निवृत्त आयएएस असताना घेतलेले क्रिमिलेअर प्रमाणपत्र यावरुन वादळ उठले. पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यूपीएससीने चौकशी करुन तिने फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले. यामुळे तिची उमेदवारी रद्द केली. आता पूजा खेडकर उच्च न्यायालयात पोहचली आहे. तिने याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा काही दिवस चर्चेत राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकर भारतातच

दिल्लीतील न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर  पूजा खेडकर दुबईला गेल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी ती भारताच असल्याचे म्हटले. दिल्ली पोलिसांनी तिच्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार, एम्स आणि मसुरी सेंटरकडून माहिती मागितली आहे. आता तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे पूजा खेडकर देश सोडून गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पूजा खेडकरच्या आईला जामीन

पूजा खेडकरची आई मनोरमा दिलीप खेडकर हिची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. शुक्रवारी पुणे न्यायालयाने मनोरमा खेडकरचा जामीन मंजूर केला होता. मुळशीमधील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमवकावल्या आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 14 दिवसांच्या आधीच त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांना येरवडा कारागृहातून सोडण्यात आले. यावेळी त्यांची नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते.

हे ही वाचा

एक होती IAS पूजा खेडकर! अधिकारी बनवण्याचा रुबाब, कॅबिन अन् अंबर दिव्याची घाई, आता सर्वच गमावून बसली

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.