AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या इशाऱ्यानंतरही गंगेच्या तीरावर मृतदेहांचं दफन सुरूच, प्रेतांची मोजदादही अशक्य

उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या काही थांबताना दिसत नाही. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली आहे. (prayagraj dead body bury in ganga after govt ban)

सरकारच्या इशाऱ्यानंतरही गंगेच्या तीरावर मृतदेहांचं दफन सुरूच, प्रेतांची मोजदादही अशक्य
ganga
| Updated on: May 18, 2021 | 12:18 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या काही थांबताना दिसत नाही. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे. सरकारने मनाई केल्यानंतरही लोक गंगेच्या काठावर मृतदेह पुरत आहेत. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसत असून त्यांची मोजदाद करणंही शक्य झालं आहे. (prayagraj dead body bury in ganga after govt ban)

गंगेच्या काठावर मृतदेह दफन केले जात असल्याचे आणि गंगेत मृतदेह सोडल्या जात असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारवर टीकाही होत होती. देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती. मृतदेह दफन केल्यास किंवा नदीत सोडल्यास कारवाईचा इशारा देतानाच या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही करण्यात आली होती. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. प्रयागराजच्या श्रृंगवेश्वर धामजवळ मृतदेहांना दफन करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे घाटावर सर्वत्र प्रेतच दिसून येत आहेत. पोलीसही हा सर्व प्रकार मूकदर्शक बघून बघत असून कोणीही मृतदेह दफन करणाऱ्यांना रोखत नाहीये.

अर्थीचं सामानही घाटवरच

घाटावर मोठ्या प्रमाणावर मृतदेह दफन केले जात आहे. ही संख्या प्रचंड मोठी आहे. एवढेच नव्हे तर मृतदेहांशेजारी झेंडेही लावले जात आहेत. तसेच मृतदेहाशेजारीच अर्थीचं सामानही ठेवलं जात आहे. त्यामुळे गंगा नदीमध्ये प्रचंड कचरा झाला आहे. कोरोना महामारीमुळे मोठ्या संख्येने गंगा किनारी मृतदेह येत आहेत. पूर्वी एका दिवसाला 8 ते 10 मृतदेह येत होते. आता दिवसाला 60 ते 70 मृतदेह येत आहेत. कधी कधी हा आकडा शंभरच्यावरही जात आहे. प्रशासनाच्या मनाईनंतरही लोक मृतदेह घेऊन येत आहेत, असं येथील पंडितांचं म्हणणं आहे.

जुनी परंपरा

मृतदेह दफन करण्याची फार जुनी परंपरा आहे. शैव संप्रदायात मृतदेह दफन केले जातात. मृतदेह दफन करण्यापासून रोखू शकत नाही. कारण त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात, असं घाटावरील एका पंडिताने सांगितलं. जे लोक गरीब असतात, ज्यांच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसतात, ते लोक मृतदेह दफन करत असतात. आता कोरोनामुळे अनेक लोक हेच करत आहेत. या काळात पूर्वीपेक्षा अधिक मृतदेह दफन केले जात आहेत. स्नान घाटापर्यंत मृतदेह दफन केले जात आहे, असं श्रृंगवेश्वर घाटाच्या एका पुरोहिताने सांगितलं. (prayagraj dead body bury in ganga after govt ban)

संबंधित बातम्या:

येणाऱ्या काळात लहान मुलांना कोरोनाचा धोका, मोदी सिस्टिमला झोपेतून जागं व्हावं लागेल: राहुल गांधी

कोव्हिडजागृती करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने बळी, IMA चे माजी प्रमुख केके अगरवाल यांचे निधन

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज, मृतांचा आकडा मात्र 4300 च्या पार

(prayagraj dead body bury in ganga after govt ban)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.