President Ramnath Kovind : राष्ट्रपती कोविंद गावी पोहोचताच भावूक, जन्मभूमीची माती भाळी लावून नमन, लहानपणीच्या मित्राचीही भेट!
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेलिकॉप्टरमधून आपली जन्मभूमी असलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोहोचले. त्यावेळी हेलिपॅडवर उतरताच त्यांनी तिथली माती कपाळावर लावली आणि जन्मभूमीला वंदन केलं.
कानपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)आज आपल्या गावी अर्थात कानपूरला पोहोचले. त्यावेळी राष्ट्रपतींचं एक भावूक रुप पहायला मिळालं. हेलिपॅडवर उतरताच राष्ट्रपती कोविंद यांनी तिथली माती आपल्या कपाळी लावून (President Touch Soil) जन्मभूमीला नमन केलं. तशी माहिती राष्ट्रपती भवनकडून देण्यात आली आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर असतानाही रामनाथ कोविंद यांना आपल्या जन्मभूमीप्रति असलेलं प्रेम आणि आदर अनेकांना भावनिक करुन गेलं. (President Ramnath Kovind bowed and touched the soil to pay obeisance to the land of his birth)
राष्ट्रपती कोविंद यांचा साधेपणा अनेकदा संपूर्ण देशानं पाहिला आहे. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. राष्ट्रपती हेलिकॉप्टरमधून आपली जन्मभूमी असलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोहोचले. त्यावेळी हेलिपॅडवर उतरताच त्यांनी तिथली माती कपाळावर लावली आणि जन्मभूमीला वंदन केलं. त्यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रपतींनी आनंदीबेन पटेल आणि योगी आदित्यनाथ यांचं स्वागत स्वीकारण्यापूर्वी आपल्या जन्मभूमीला वंदन केलं. त्यांचा हा फोटो राष्ट्रपती भवनाकडून ट्वीट करण्यात आला आहे. या फोटोच्या माध्यमातून राष्ट्रपती कोविंद यांचा साधेपणा आणि आपल्या जन्मभूमीप्रति असलेलं प्रेम दिसून आलं.
In a rare emotional gesture, after landing at the helipad near his village, Paraunkh of Kanpur Dehat district of Uttar Pradesh, President Ram Nath Kovind bowed and touched the soil to pay obeisance to the land of his birth: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/kgaU7Xv55w
— ANI (@ANI) June 27, 2021
राष्ट्रपतींनी घेतली लहानपणीच्या मित्राची भेट
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपला लहानपणीचा मित्र कृष्ण कुमार हे आजारी असल्याची माहिती मिळाली. तेव्हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी राष्ट्रपती कोविंद बेचैन झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपतींनी आपल्या मित्राची भेट घेत आपण राष्ट्रपती नाही तर एका मित्राच्या नात्यानं कृष्ण कुमार यांची भेट घेतल्याचं म्हटलं.
तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवारांना विश्वास https://t.co/46iNgRF0R2 #SharadPawar | #NCP | #Baramati | #MahavikasAghadi | @PawarSpeaks | @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 27, 2021
इतर बातम्या :
तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवारांना विश्वास
President Ramnath Kovind bowed and touched the soil to pay obeisance to the land of his birth at kanpur district