Central Vista Project : पंतप्रधान मोदींकडून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची पाहणी, जवळपास तासभर केली कामाची पाहणी
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानासह अनेक नवीन कार्यालय इमारती आणि मंत्रालयांच्या कार्यालयांसाठी केंद्रीय सचिवालय यासह नवीन संसद भवन आणि नवीन निवासी संकुल बांधण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : क्वाड समिटच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावरुन परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री अचानक नवी दिल्लीतील संसदेच्या नवीन वास्तू असलेल्या व्हिस्टा प्रकल्पाला भेट दिली. तेथील कामाचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. या भेटीची कुठलीही घोषणा न करता त्यांनी प्रकल्पाचे ठिकाण गाठले होते. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हा पंतप्रधान मोदींचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून प्रकल्पाच्या कामात कुठलीही हयगय होवू नये या दृष्टीकोनातून ते कामावर लक्ष ठेवून आहेत. आज रात्री ते 8.45 वाजण्याच्या सुमारास प्रकल्प बांधकामाच्या ठिकाणी पोहचले होते. पुढील जवळपास तासभर त्यांनी बांधकामाची पाहणी केली व तेथील अधिकाऱ्यांकडून कामाच आढावा घेतला. (Prime Minister Modi inspects Central Vista project, inspects work for about an hour)
सुमारे 20,000 कोटी रुपयांचा आहे प्रकल्प
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानासह अनेक नवीन कार्यालय इमारती आणि मंत्रालयांच्या कार्यालयांसाठी केंद्रीय सचिवालय यासह नवीन संसद भवन आणि नवीन निवासी संकुल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत 3 किमी क्षेत्राचे पुनर्वसन केले जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे 20,000 कोटी रुपयांचा आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 2022 मध्ये नवीन इमारतीत होणार?
सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, संसदेचे हिवाळी अधिवेशन 2022 मध्ये नवीन इमारतीत होणार आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे क्षेत्रफळ 64,500 चौरस फूट असेल. यात एक भव्य ‘संविधान सभागृह’ असेल ज्यात भारताचा लोकशाही वारसा जपला जाईल. याशिवाय खासदारांसाठी विश्रामगृह, ग्रंथालय, अनेक समिती कक्ष, जेवणाचे कक्ष आणि पार्किंगची जागा असेल. नवीन इमारतीत लोकसभेत 888 सदस्यांसाठी आसन व्यवस्था असेल तर राज्यसभेत 384 सदस्य बसू शकतील.
पंतप्रधान मोदींनी अलीकडेच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करणाऱ्यांना टोला लगावला, ते म्हणाले की असे लोक संरक्षण कार्यालय संकुलांच्या मुद्यावर मौन बाळगतात कारण त्यांना माहित होते की ते “भ्रम आणि खोटे” पसरवण्यांची पोलखोल करतील. त्यांनी आग्रह धरला की “जगण्याची सुगमता” आणि “व्यवसायात सुलभता” ही भावना आज सेंट्रल व्हिस्टावर होत असलेल्या कामाच्या मुळाशी आहे.
‘डिफेन्स ऑफिस कॉम्प्लेक्सची निर्मिती सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा हिस्सा’
दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू येथे संरक्षण कार्यालय संकुलांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले. डिफेन्स ऑफिस कॉम्प्लेक्सचे बांधकाम सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. कॅम्पसचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधानांनी कॅम्पसची पाहणी केली होती आणि सेंट्रल व्हिस्टा वेबसाईटही लाँच केली होती.
ते म्हणाले होते की, नव्याने बांधलेले संरक्षण कार्यालय संकुल हा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग आहे. प्रकल्पाच्या समीक्षकांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, “जे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या मागे लागले होते, त्यांनी चतुराईने त्यावर मौन पाळले आहे. हे (डिफेन्स ऑफिस कॉम्प्लेक्स) सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे, जेथे 7,000 हून अधिक सैन्य अधिकारी आणि कर्मचारी काम करतात.
काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांनी या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि हे अनावश्यक असल्याचे म्हटले होते. यावर पंतप्रधान म्हणाले की, “त्यांना (टीकाकारांना) माहित होते की भ्रम पसरवण्याचा हेतू आहे. खोटे पसरवण्याचा हेतू आहे. ही गोष्ट समोर येताच, त्यांच्या सर्व गोष्टी चालणार नाहीत. पण आज सेंट्रल व्हिस्टाच्या मागे सरकार काय करत आहे ते देश पाहत आहे.” (Prime Minister Modi inspects Central Vista project, inspects work for about an hour)
Sanjay Raut | ठोकून काढणं हा आपला जुना धंदा, तो विसरायचा नाही : संजय राऊतhttps://t.co/3WSQzNyLFN#sanjayRaut | #shivsena | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2021
इतर बातम्या
आरसीबीच्या विजयात हर्षल पटेल चमकला, घेतली जबरदस्त हॅट्रीक, पाहा VIDEO