Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा भडका, पुतीन-मोदींची फोनवर चर्चा; मोदी म्हणाले, चर्चेतूनच प्रश्न सुटेल

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia ukraine Crisis) युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 137 लोक ठार झाले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील (ukraine attack) अनेक शहरं उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.

Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा भडका, पुतीन-मोदींची फोनवर चर्चा; मोदी म्हणाले, चर्चेतूनच प्रश्न सुटेल
रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा भडका, पुतीन यांचा मोदींना फोन; मोदी म्हणाले, चर्चेतूनच प्रश्न सुटेल
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 2:40 PM

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia ukraine Crisis) युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 137 लोक ठार झाले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील (ukraine attack) अनेक शहरं उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर भारतासह अनेक देशातील विद्यार्थी आणि नागरिक या दोन्ही देशात अडकून पडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्याशी चर्चा केली. तसेच पुतीन यांनी मोदींना युक्रेनवर हल्ला का करावा लागला याची माहिती देतानाच सध्याची परिस्थितीही अवगत केली आहे. तर मोदींनी चर्चा आणि शांततेने मार्ग काढण्याचं आवाहन मोदींनी पुतीन यांना केलं आहे. तसेच रशिया आणि नाटोमधील मतभेद प्रामाणिकपणे चर्चेने सोडवण्याचा सल्लाही मोदींनी दिला आहे. त्यामुळे पुतीन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रशिया आणि नाटो समूहाच्या दरम्यान असलेले मतभेद केवळ चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतात, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांना दिला आहे. तसेच तात्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया आणि युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा. त्यासाठी प्रयत्न करावा, असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे.

भारतीयांना मायदेशी आणणं हेच सर्वोच्च प्राधान्य

यावेळी मोदींनी युक्रेन आणि रशियात अडकून पडलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची दोन्ही देशातून सुरक्षित सुटका व्हावी आणि त्यांनी परत मायदेशी आणण्यास भारत सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं मोदींनी पुतीन यांना सांगितलं. त्यावर पुतीन यांनीही सहमती दर्शवली आहे. या संदर्भात दोन्ही देशातील नेते आणि अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहणार असल्याचंही यावेळी ठरलं.

मोदींची तातडीची बैठक

मोदी आणि पुतीन यांची फोनवर चर्चा होण्यापूर्वी भारतीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी संवाद साधला होता. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी थोड्याच वेळात पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परिस्थितीची समीक्षा करण्यासाठी मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मुद्द्यांवर कॅबिनेटची बैठक झाली. यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असणार असल्याचं स्पष्ट केलं. परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही मोदींनी यावेळी दिले होते.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War Live: यूक्रेनवरील हल्ले थांबवा, नाटोकडेही अणूबॉम्ब, फ्रान्सचा रशियाला इशारा

Russia-Ukraine War : कोण आहे ‘ही’ शस्त्रधारी युक्रेनी महिला? जीची सोशल मीडियावर सुरूये जोरदार चर्चा

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावरच्या भारतीय भूमिकेवर अमेरिका नाराज, बायडेन यांना काय हवे?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.