AMUच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार

अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1964 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री AMUच्या दिक्षांत सोहळ्यात सहभागी झाले होते.

AMUच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार
narendra modi
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 12:05 AM

अलीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अलीगड मुस्लिम विद्यापीठ अर्थात AMUच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अलीगड मुस्लिम विद्यालयाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (PM Narendra Modi will participate in the centenary celebrations of AMU)

महत्वाची बाब म्हणजे अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1964 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री AMUच्या दिक्षांत सोहळ्यात सहभागी झाले होते. तेव्हा शास्त्रीजींना AMUकडून LLDची मानद पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं.

कोरोना विषाणूच्या प्रसाराचा धोका लक्षात घेता शताब्दी सोहळ्याचे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी AMUच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार असल्याने विद्यापीठाचे कुलगुरु तारिक मन्सूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक वर्षी विद्यापीठाचा विकास अधिक वेगानं होईल. ज्यामुळे विद्यार्थांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नियुक्तांमध्ये मदत होईल, असं मत कुलगुरुंनी व्यक्त केलं आहे.

काही विद्यार्थी संघटनांचा विरोध

AMUच्या शताब्दी सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. ‘गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाला पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हात मुस्लिमांच्या हत्येनं रंगलेले आहेत. मोदी यांची उपस्थिती सहन केली जाणार नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही काळे झेंडे दाखवू’, असा इशारा विद्यापीठाच्या छात्र संघाचे माजी उपाध्यक्ष नदीम अन्सारी यांनी दिलाय. विद्यापीठातील वातावरण बिघडलं तर त्याला सर्वस्वी विद्यापीठच जबाबदार राहील. कुलगुरुंनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी या कार्यक्रमात मोदींना निमंत्रित केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

संबंधित बातम्या:

गोव्यात मंदिरात होत असलेल्या लग्नाला राष्ट्रपतींची सरप्राईज विझिट, नवविवाहितांना आशीर्वाद

ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान

PM Narendra Modi will participate in the centenary celebrations of AMU

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.