नवी दिल्ली : आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा (Azadi ka Amrut Mahotstav) उत्साह दिसून येत आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) लाल किल्ल्यावरून नागरिकांशी संवाद साधताना काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर तो क्षण आता आला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण सुरू आहे. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लाल किल्ल्यावरून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, आजाच दिवस ऐतिहासिक आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचं मोलाचे योगदान आहे.आज महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस आहे. आज महात्मा गांधी (Mahatma Gandhi), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा.सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा.सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये तसेच देशाच्या जडघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आज त्यांचे स्मरण करून आभार मानायचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पीत केले. स्वातंत्र्य हाच त्यांचा ध्यास होता. अशा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र दिवस आहे.देशाने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशातील जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे की, भारत हाच लोकशाहीचा जनक आहे. लोकशाही काय असते हे भारताने जगाला दाखवून दिले आहे.विविधता हिच भारताची शक्ती आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे.आज मोदी यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला आहे. जब हम अपनी धरती से जुडेंगे, तभी तो ऊंचा उडेंगे’ असं म्हणत मोदींनी नागरिकांना स्वदेशी वस्तुंचा वापर करण्याचे आवाहन केले.