शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… आई गेल्यानंतर मोदी यांचं भावूक ट्विट
बुधवारी हीराबेन मोदी यांना प्रकृती खालावल्याने अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आईची तब्येत बिघडल्याचं वृत्त कळताच मोदी यांनी रुग्णालयात धाव घेतली होती.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं दीर्घ आजाराने अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. आईच्या निधनाचं वृत्त स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… असं मोदी यांनी आईच्या निधनाचं ट्विट करताना म्हटलं आहे. तसेच त्यांनी आईबद्दलच्या आठवणीही जागवल्या आहेत.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
हे सुद्धा वाचा— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
आईच्या निधनानंतर मोदी यांनी दोन ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी आईच्या निधनाची माहिती देतानाच आईबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. शानदार शताब्दी ईश्वर चरणी लीन झाली. तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांना वाहिलेलं आयुष्य या तीन गोष्टी मी नेहमीच आईमध्ये पाहिल्या आहेत, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.
त्यानंतर मोदी यांननी दुसऱ्या ट्विटमध्ये आईविषयीची भावना व्यक्त केली आहे. या ट्विटमधून मोदी अत्यंत भावूक झालेले दिसत आहेत. आईचा 100वा वाढदिवस होता. त्यावेळी मी तिला भेटलो होतो. त्यावेळी तिने मला एक मंत्र दिला. तो मला नेहमीच स्मरणात आहे. काम बुद्धिने करा आणि जीवन शुद्धीने जगा, असं आई म्हणाली होती, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
मोदी यांनी आपल्या ट्विटसोबत आईचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत मातोश्री हिराबेन खूर्चीवर बसल्या आहेत. त्यांच्या हातात एक ताट आहे. त्या ताटात दिवा पेटलेला आहे. अत्यंत बोलका आणि हृदयाला हात घालणारा असा हा फोटो आहे.
बुधवारी हीराबेन मोदी यांना प्रकृती खालावल्याने अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आईची तब्येत बिघडल्याचं वृत्त कळताच मोदी यांनी रुग्णालयात धाव घेतली होती.
गेल्या तीन दिवसांपासून हीराबेन यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं वृत्तही येत होतं. मात्र, आज पहाटे त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.