Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashi Vishwanath Corridor| पंतप्रधान मोदींचे काशी विश्वनाथाच्या साक्षीने तीन संकल्प; देशासाठी जनता जनार्दनाला साकडे!

काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे...असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकविले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाकडे तीन संकल्पाची मागणी केली.

Kashi Vishwanath Corridor| पंतप्रधान मोदींचे काशी विश्वनाथाच्या साक्षीने तीन संकल्प; देशासाठी जनता जनार्दनाला साकडे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण केले.
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 3:09 PM

वाराणसीः काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे…असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकविले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाला साकडे घालत तीन संकल्पाची मागणी केली. मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचे (Kashi Vishwanath Dham) लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

काशी में एक ही सरकार है…

ज्या कामगारांनी आपला घाम गाळून काशीमध्ये हा भव्य परिसर तयार केला, त्यांचे आभार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मानले. कोरोनाच्या बिकट काळातही त्यांनी काम थांबवले नाही. मला या श्रमिकांना भेटण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. काशी तो काशी है! काशी तो अविनाशी है. काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है, उनकी सरकार है, असे म्हणत पंतप्रधान एकदम तल्लीन झाले.

काशीला कोण रोखणार…

जिथे गंगा आपली धारा बदलून वाहते. त्या काशीला कोण रोखू शकते, असा सवालही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काशी ही चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे. अहिंसा आणि तपस्याचे प्रतीक आहे. राजा हरिश्चंद्राच्या सचोटीपासून वल्लभाचार्य, रामानंद जी यांच्या ज्ञानापर्यंत तर चैतन्य महाप्रभू, समर्थ गुरु रामदास ते स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय अशा कित्येकांचा या भूमीशी संबंध आहे. किती ऋषी आणि आचार्यांचा संबंध आहे, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

जनता ईश्वराचे रूप

पंतप्रधान मोदींनी जनतेला भगवान संबोधत त्यांच्याकडून तीन गोष्टी मागितल्या. ते म्हणाले, गुलामीच्या मोठ्या कालखंडाने भारतीयांचा आत्मविश्वास चक्काचूर केला. त्यामुळे आपण आपल्याच सृजनावरील विश्वास गमावून बसलो. आज हजारो वर्ष जुन्या या काशीतून मी देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सृजनाची कास धरावी. नवनिर्मिती करा. इनोवेटीव पद्धतीने काही करा. माझ्यासाठी जनता जनार्दन ईश्वराचे रूप असल्याचे ते म्हणाले.

काय आहेत मोदींचे तीन संकल्प?

पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येक भारतीयांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही मागू इच्छितो. हे माझ्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी तीन संकल्प करा. स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भर भारतासाठी सततचे प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मोदी पुढे म्हणाले की, तिसऱ्या संकल्पाची आत्ताच सुरुवात करावी लागेल. हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा मोठा सोहळा होईल. त्यावेळी भारत कसा असेल, त्यासाठी आत्तापासून काम करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

Kashi Vishwanath Corridor: जेव्हा औरंगजेबाचा अत्याचार वाढतो, तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी छत्रपती शिवाजीच येतात: नरेंद्र मोदी

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.