प्रियांका गांधी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, भारतीय लोकशाहीचं मोठेपणं सांगणारं दृश्य, पाहा Video

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election ) रणधुमाळी सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक 7 टप्प्यात घेण्यात येत आहे. सात पैकी पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडलंय.

प्रियांका गांधी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, भारतीय लोकशाहीचं मोठेपणं सांगणारं दृश्य, पाहा Video
प्रियांका गांधी आणि भाजप कार्यकर्ते
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 7:57 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election ) रणधुमाळी सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक 7 टप्प्यात घेण्यात येत आहे. सात पैकी पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडलंय. सध्या चौथ्या टप्प्याची रणधुमाळी सुरु आहे. प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) आणि अखिलेश यादव प्रचारादरम्यान समोर आल्याचं यापूर्वी दिसून आलं होतं. प्रचारादरम्यान प्रियांका गांधी आणि भाजप (BJP) कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी राजकारणात दुर्मिळ होत असलेलं चित्र पाहायला मिळालं. प्रियांका गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी हस्तोंदलन केलं. भाजप कार्यकर्त्यांनी देखील प्रियांका गांधी यांना प्रतिसाद दिला. प्रियांका गांधी यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसचा जाहीरनामा दिला. भाजप कार्यकर्त्यांनी देखील ब्रेसलेट मागून घेतलं आहे. प्रियांका गांधी यांनी यावेळी महिला सुरक्षेच्या मुद्याला प्राधान्य दिलं आहे.

पाहा व्हिडीओ :

प्रियांका गांधी यांच्यावर काँग्रेसकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांनी महिला सुरक्षा आणि महिलांच्या प्रश्नांवर भर देणार जाहीरनामा तयार केला आहे. यूथ काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत प्रियांका गांधी आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत. प्रियांका गांधी गाडीत बसून काँग्रेसचा जाहीरनामा भाजपच्या कार्यकर्त्यांना देत आहेत. भाजपचे कार्यकर्ते प्रियांका गांधी यांच्याकडे बँडची मागणी करत आहेत. प्रियांका गांधी देखील त्यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

दुसऱ्या एका व्हिडीओत प्रियांका गांधी गाडीतून बाहेर येऊन भाजप कार्यकर्त्यांशी हस्तोंदलन करताना दिसत आहेत. भाजप कार्यकर्ते देखील प्रियांका गांधी यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकूणचं भारतीय लोकशाहीतील दुर्मिळ होत असलेलं चित्र यानिमित्तानं दिसून आलं आहे.

इतर बातम्या:

सुप्रिया सुळेंसह महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसद रत्न पुरस्कार, अभिनंदन आत्या..! पार्थ पवार यांचं खास ट्विट

दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, झाल्या तर कशा; सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला!

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.