पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या, गोळीबारात ठार, दोन साथीदारही जखमी

पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आप सरकारने शनिवारीच सिद्धू मुसेवाला याची सुरक्षा कमी केली होती. मुसेवाला याच्याकडे आधी ८ ते १० सुरक्षारक्षक होते. कालपासून सुरक्षा कमी केल्यानंतर मुसेवाला याच्या संरक्षणासाठी केवळ दोनच गनमॅन ठेवले होते.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या, गोळीबारात ठार, दोन साथीदारही जखमी
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 7:48 PM

चंदीगड – प्रसिद्ध पंजाबी गायक (Panjabi Singer)सिद्धू मुसेवाला (Siddhu Musewala)याची भरदिवसा हत्या (shot dead)करण्यात आली आहे. त्याच्यावर मनसा येथील जवाहरके गावात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचे दोन साथीदार जखमी झाले आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आप सरकारने शनिवारीच सिद्धू मुसेवाला याची सुरक्षा कमी केली होती. मुसेवाला याच्याकडे आधी ८ ते १० सुरक्षारक्षक होते. कालपासून सुरक्षा कमी केल्यानंतर मुसेवाला याच्या संरक्षणासाठी केवळ दोनच गनमॅन ठेवले होते. प्राथमिक माहितीनुसार मुसेवाला त्याच्या साथीदारांसह गाडीतून जात होता. त्यावेळी काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. घरापासून पाच किमी अंतरावर असतानाच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी मुसेवाला हा स्वताच गाडी ड्राईव्ह करीत होता.

काँग्रेसच्या तिकिटावर विजय सिंगलाच्या विरोधात लढला होता

सिद्धू मुसेवाला हा पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत मानसा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर आम आदमी पार्टीच्या डॉ. विजय सिंगला यांच्याविरोधात निवडणूक लढला होता. मुसेवाला या निवडणुकीत पराभूत झाला, आणि त्याला हरवणारे सिंगला हे राज्याचे आरोग्यमंत्री झाले. नुकतेच सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात मुख्यमंत्री मान यांनी त्यांची मंत्रीपदावरुन त्यांची उचलबांगडी केली होती. आता सिद्धू याच्या निधनानंतर हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का असल्याचे ट्विट काँग्रेसने केले आहे.

जीवाला धोका असल्याचे सिद्धूने कालच वकिलांना सांगितले

कालच सिद्धू मुसेवाला याने आपल्या वकिलांना फोन केला होता. त्यावेळी आपल्या जीवाला धोका आहे, असे त्याने वकिलांना सांगितले होते. पंजाब सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता आपली सुरक्षा कमी केल्याचेही त्याने सांगितले. आता सुरक्षेसाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागेल असेही त्याने सांगितले होते.

सिद्धूची वादग्रस्त कारकीर्द

सिद्धूवर गाण्यात गन कल्चर प्रमोट करण्याचे आरोप करण्यात आले होते. पोलीस फयरिंग रेंजमध्ये एके ४७ रायफलमधून निशाणेबाजी करताना तो दिसला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश, मत्र निवडणुकीत पराभूत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.