पटापट पेट्रोलचे टँक भरून घ्या, मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार, राहुल गांधी यांचा खोचक टोला
येत्या आठवड्यात विधानसभा निवडणुका आणि त्यांचे निकाल जाहीर होतील. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्यास सुरुवात होईल. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या बॅरलची किंमत 100 डॉलर प्रति बॅरल पेक्षा अधिक झालीय.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विधानसभा निवडणुकानंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती वाढणार असल्याच्या शक्यतेमुळं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी लोकांना पटापट पेट्रोल टँक भरून घ्या कारण इलेक्शन ऑफर लवकरच संपणार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधलाय. पाच राज्यातील निवडणुकांसाठीचा प्रचार संपला आहे. त्यामुळं राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निवडणुकांमुळं वाढवण्यापासून थाबवल्याचा आरोप केला. मात्र, निवडणुका झाल्यानंतर लगेचच किमती वाढतील, अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याचा प्रचार आज संपला आहे. आता 7 मार्चला मतमोजणी होईल आणि 10 मार्चला निकाल लागणार आहेत.
राहुल गांधी यांचं ट्विट
फटाफट Petrol टैंक फुल करवा लीजिए।
मोदी सरकार का ‘चुनावी’ offer ख़त्म होने जा रहा है। pic.twitter.com/Y8oiFvCJTU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 5, 2022
पुढील आठवड्यापासून पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार
विधानसभा निवडणुका पुढील आठवड्यात पार पडतील. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्यास सुरुवात होईल, असं बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत 100 डॉलर प्रति बॅऱलच्या पुढं गेलेली आहे. यामुळं तेल कंपन्यांनी सामान्य नफा मिळवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 9 रुपयांची वाढ करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. रशियाकडून होणाऱ्या तेल पुरवठ्यात खंड पडण्याची शक्यता असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर भडकले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2014 नंतर पहिल्यांदा क्रुड ऑईलचे दर 110 डॉलरच्या वर गेले आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम योजना आणि विश्लेषण कमिटीच्यावतीनं भारत जे कच्चे तेल आयात करत त्याचा 1 मार्चचा दर 102 डॉलर प्रति बॅरल होता, असं म्हटलं आहे. 2014 नंतर कच्चा तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गेल्यावर्षी ज्यावेळी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली त्यावेळी आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड आईलच्या बॅऱलचा दर 81.5 डॉलर होता.
जे. पी. मॉर्गन या ब्रोकरेज कंपनीच्या वतीनं एका रिपोर्टमध्ये आगामी आठवड्यात विधानसभा निवडणुका संपतील. त्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना लिटरमागं 5 रुपये 70 पैशांचा तोटा सहन करावा लागतोय, असा दावा करण्यात आला आहे. 118 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल करण्यात आले नाहीत.
इतर बातम्या :
Assembly Election 2022 : स्वतंत्र भारतात नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान, अमित शाहांचा दावा
जशास तसं ! ईडीनं मविआ नेत्यांना तासनतास बसवलं आता मुंबई पोलीसांनी राणेंना, 5 तासापासून चौकशी