Rahul Gandhi Twitter : मोदी सरकारच्या दबावामुळं नव्या फॉलोअर्सची संख्या घटली, राहुल गांधीचं ट्विटरला पत्र, पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरला (Twitter) पत्र लिहिलं आहे. नव्या फॉलोअर्सला राहुल गांधी यांची प्रोफाईल दाखवण्यात येत नाही. हे सर्व मोदी सरकारच्या (Modi Government) दबावामुळं सुरु असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

Rahul Gandhi Twitter : मोदी सरकारच्या दबावामुळं नव्या फॉलोअर्सची संख्या घटली, राहुल गांधीचं ट्विटरला पत्र, पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार
देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 12:00 PM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरला (Twitter) पत्र लिहिलं आहे. नव्या फॉलोअर्सला राहुल गांधी यांची प्रोफाईल दाखवण्यात येत नाही. हे सर्व मोदी सरकारच्या (Modi Government) दबावामुळं सुरु असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.ऑगस्ट 2021 मध्ये राहुल गांधी यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्यानंतर नव्या फॉलोअर्सची संख्या घटत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबरला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दबावात काम करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटलंय?

राहुल गांधी यांनी ट्विटरला नव्या फॉलोअर्ची संख्या घटल्याचं ट्विटरच्या निदर्शनास आणून दिलं आहे. सुरुवातील दरमहा राहुल गांधी यांच्या ट्विटरला फॉलो करणाऱ्यांची संख्या दरमहा 2.3 लाख होती. ती 6.5 लाखांवर पोहोचली होती. मात्र, ऑगस्ट 2021 नंतर ती संख्या दरमहा अडीच हजारांवर आली आहे. राहुल गांधींनी या काळात त्यांचे 19.5 दशलक्ष फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचं म्हटंल आहे.

राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट ऑगस्टपासून वादात?

राहुल गांधी यांनी ऑगस्ट 2021 अत्याचारग्रस्त पीडितेच्या कुटुंबाचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी ट्विटरकडे तक्रार केली होती. ट्विटरचे नियम राहुल गांधी यांनी मोडल्यानं त्यांचं अकाऊंट आठ दिवसांसाठी बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आलं होतं. काँग्रेसनं त्या घटनेपासून राहुल गांधी यांच्या नव्या फॉलोअर्सची संख्या घटत चालली असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार?

राहुल गांधी हे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलं आहे. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी पत्रकार परिषदेत काय बोलतात हे पाहून आम्ही निर्णय घेऊ, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

औरंगाबाद DMIC मध्ये फूडपार्कची दोन वर्षांपूर्वी घोषणा, अद्याप कामाला सुरुवात नाही, काय आहे कारण?

Nagpur NMC | करमाफीचा अधिकार मनपाला आहे काय?, तांत्रिक अडचणी तर नाहीत ना!

Rahul Gandhi wrote letter Twitter Ceo Parag Agrawal claim under govt pressure twitter limit his new followers

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.