राजस्थान काँग्रेसमध्ये काय चाललंय?, तीन मंत्री राजीनाम्याच्या तयारीत; थेट सोनिया गांधींना लिहलं पत्र
राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. येथे तीन मंत्र्यांनी थेट काँग्रेसच्या हायकमांड म्हणजेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
जयपूर : राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. येथे तीन मंत्र्यांनी थेट काँग्रेसच्या हायकमांड म्हणजेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रिपदाचा राजीमाना देऊन पक्षाच्या बळकटीकरणासाठी काम करण्याची इच्छा या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवल्यानंतर राजस्थानचे प्रभारी अजय माकन थेट जयपूरला पोहोचले आहेत.
तीन मंत्र्यांचं थेट सोनिया यांना पत्र, राजीमाना देण्याची इच्छा
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील अशोक गेहलोत सकारच्या रघू शर्मा, हरिश चौधरी, गोविंद सिंग डोटासरा या मंत्र्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मंत्रिपदाचा राजीमाना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही माहिती राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी दिलीय.
राजस्थान मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता
सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. येथे पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी संघटनेत मोठे फेरबदल करण्याचा विचार काँग्रेसचा आहे. राजस्थानच्या मंत्रिमंडळातदेखील मोठे बदल करण्याचा होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आधीपासून यावर विचार केला जातोय. या पार्श्वभूमीवर तीन मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीमाना देण्याची इच्छा व्यक्त केलीय. राजस्थानच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याची चर्चा आणि मंत्र्याचे सोनिया यांना पत्र या दोन्ही गोष्टींना एकमेकांशी जोडले जात आहे.
राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन जयपूरला पोहोचले
दरम्यान, मंत्र्यांच्या या पत्रव्यवहारानंतर राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन जयपूरला पोहोचले आहेत. ते स्थानिक नेत्यांशी यावर चर्चा करणार आहेत. मागील काही दिवसांपूसन काँग्रेस नेते सचिन पायलट आणि राजास्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत या दोन्ही नेत्यांच्या गटामध्ये ओढाताण सुरु आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता राजस्थान काँग्रेसमध्ये काय काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :
मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही, बाळासाहेब थोरातांचं टीकास्त्र
Farm Laws : पंतप्रधान मोदींनी त्या 700 शेतकरी कुटुंबीयांची माफी मागावी- संजय राऊत