AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येसाठी पाकिस्तानातून खास वस्तू, राम मंदिराच्या पूजेत होणार वापर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी जगभरातून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. या देशांमधून विशेष प्रतिनिधीमंडळ येणार आहेत. पाकिस्तानमधून या समारंभासाठी विशेष वस्तू आणण्यात आली आहे. या वस्तूचा वापर पूजेनंतर प्रसादात करण्यात येणार आहे.

अयोध्येसाठी पाकिस्तानातून खास वस्तू, राम मंदिराच्या पूजेत होणार वापर
RAM MANDIRImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 18, 2024 | 9:09 AM
Share

अयोध्या, दि.18 जानेवारी 2024 | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठान २२ जानेवारी रोजी होत आहे. अयोध्येत १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरु झाला. आज या समारंभात तीर्थ पूजन, जल यात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास होणार आहे. बुधवारी रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली होती. या समारंभासाठी जगभरातून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतून अनेक भेटवस्तू आल्या आहे. या देशांमधून विशेष प्रतिनिधीमंडळ येणार आहेत. पाकिस्तानामधून या समारंभासाठी विशेष वस्तू आली आहे. या वस्तूचा वापर पूजेनंतरच्या प्रसादासाठी करण्यात येणार आहे.

सैंधव मीठ पाकिस्तानातून आले

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी पूजेनंतर भगवान राम यांना भोग लावण्यात येणार आहे. भोग म्हणजेच प्रसादात पाकिस्तानातून आलेल्या खास वस्तूचा वापर करण्यात येणार आहे. ही वस्तू म्हणजे सैंधव मीठ आहे. सैंधव मीठचा वापर उपवास आणि पवित्र कामांमध्ये केला जातो. सैंधव मीठ जगात फक्त पाकिस्तानातच तयार होते. भारतात सैंधव मीठ पाकिस्तानातूनच येते.

पाकिस्तानसोबत करार

सैंधव मीठ रॉक साल्टपासून किंवा लाहौरी मीठापासून तयार होते. पाकिस्तानशी संबंध बिघडाल्यानंतर कधीही या मीठाची आयात रोखली गेली नाही. यासंदर्भात दोन्ही देशांत करार झाला आहे. पाकिस्तानातील लाहोरमधून हे मीठ येणार असल्यामुळे त्याला लाहौरी मीठ म्हटले जाते. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भाग असलेला पंजाबातून सैंधव मीठ कोह नाम या पर्वतावर मिळते. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते. यामुळे त्याला खनिज मीठ म्हणतात. आरोग्यासाठी हे हितकारक आणि त्रिदोषशामक आहे. चरकाचार्य यांनी सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण म्हणजे मीठ म्हटले आहे. या मिठात लोह तत्त्व आणि गंधक असतो. उपवासाच्या पदार्थांमध्ये आपल्याकडे सैंधवा मीठाचा वापर केला जातो.

रामलल्लासाठी 56 व्‍यंजनाचा भोग

रामलल्लासाठी 56 व्यंजनाचा भोग लावण्यात आला आहे. त्यात पाकिस्तानातून आलेल्या सैंधव मीठ आहे. पाकिस्तानातून हे मीठ दोन रुपये प्रती किलोने भारतात येते. त्यावर 200 टक्के कर लावला जातो. यामुळे भारतात त्याची किंमत सहा रुपये प्रतिकिलो होते. त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्यूशन केले जाते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्‍नीशियम असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

हे ही वाचा

रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत

अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.