Ram mandir : रामलल्लाच्या चरणी करोडो रुपये दान, 15 दिवसात कोट्याधीश झाले रामलल्ला
Ram mandir : राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशातच नाही तर संपूर्ण जगातून लोकं अयोध्येत दर्शनाला येत आहे. दररोज २ लाखाहून अधिक लोकं रामलल्लाचे दर्शन घेत आहे. रामलल्ला विराजमान झाल्यापासून आतापर्यंत करोडो रुपये दान म्हणून आले आहेत. लोकांनी सोने-चांदीचे दागिने ही दान केले आहेत.
Ram Mandir : राम मंदिरात रामलल्ला २२ जानेवारी रोजी विराजमान झाल्यानंतर रामभक्त दररोज लाखो रुपये दान करत आहेत. 23 जानेवारीपासून सातत्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे. रविवारी रात्री आरतीनंतर सर्व दानपेट्या उघडण्यात आल्या. त्यानंतर भक्तांनी अर्पण केलेल्या पैशांची मोजणी सुरू झाली, जी पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होती.
गेल्या १५ दिवसांत राम मंदिरात करोडो रुपये भाविकांनी दान केला आहे. रोख रक्कम या शिवाय दानपेटीतून सोन्या-चांदीचे दागिनेही सापडले आहेत. मंदिर उघडल्यानंतर गेल्या 15 दिवसांत 30 लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. रामललाच्या दरबारात दररोज सरासरी दोन लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत.
सोने-चांदीचे दागिने दान
रामलल्ला पुढे कोणी पैसे, कोणी सोने-चांदी दान करत आहेत. दानपेट्यांमध्ये एक कोटींहून अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि राममंदिर ट्रस्टचे सदस्या यांच्या उपस्थितीत दान पेट्या उघडल्या जातात. त्यानंतर त्याची मोजणी होते. त्यानंतर ते पैसे बँकेत जमा केले जातात.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली या दानपेट्या उघडल्या जातात आणि त्याची मोजणी केली जाते. राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी माहिती दिली की, गेल्या 15 दिवसांत दानपेटीतून करोडो रुपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत. दानपेटीतील देणग्या दर 15 दिवसांनी मोजल्या जातात.
15 कोटी रुपयांची देणगी विविध माध्यमातून प्राप्त
प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, मंदिर उघडल्यानंतर १५ दिवसात माध्यमातून १५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. राम मंदिर परिसरात यासाठी दहा डोनेशन काउंटर उभारण्यात आले आहेत. याशिवाय मंदिराच्या गर्भगृहाच्या समोर आता सहा दान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत.
राम मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दहा डोनेशन काउंटरवर ट्रस्टचे कर्मचारी कार्यरत असून देणगी दिल्यावर पावतीही दिली जात आहे. देणग्यांचा हिशेब दररोज संध्याकाळी ट्रस्टच्या कार्यालयात जमा केला जातो.
१५ दिवसात किती देणगी
22 जानेवारी-3.17 कोटी
23 जानेवारी-2.90 कोटी
24 जानेवारी- 2.43 कोटी
25 जानेवारी- 12.50 लाख
26 जानेवारी- 1.15 कोटी
27 जानेवारी- 31 लाख
28 जानेवारी- 34.25 लाख
29 जानेवारी-32.50 लाख
30 जानेवारी-29.15 लाख
31 जानेवारी- 54.42 लाख
01 फेब्रुवारी- 14.00 लाख
02 फेब्रुवारी- 08.25 लाख
03 फेब्रुवारी-10.14 लाख
04 फेब्रुवारी-22.35 लाख
05 फेब्रुवारी-20.17 लाख
06 फेब्रुवारी-40. 24 लाख