राम मंदिर 20 आणि 21 जानेवारी रोजी राहणार बंद, पाहा काय आहे कारण

Ram mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण त्याआधी दोन दिवस राम मंदिर बंद राहणार आहे. काय आहे या मागचे कारण जाणून घ्या.

राम मंदिर 20 आणि 21 जानेवारी रोजी राहणार बंद, पाहा काय आहे कारण
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 2:17 PM

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरात उत्साह दिसून येत आहे. अयोध्येत यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. पण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने राम मंदिर 20 आणि 21 जानेवारीला बंद राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली आहे.

22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात येणार आहे. या दिवशी अयोध्येत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत देशातील ज्येष्ठ नेते, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर तसेच उद्योग आणि क्रीडा जगताशी निगडित अनेकांना कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

सर्वसामान्यांना दर्शन कधी मिळणार?

22 जानेवारी रोजी देशभरातील मोठी लोकं या कार्यक्रमाला अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे इतर लोकांना या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव राम मंदिरात प्रवेश करता येणार नाही. अयोध्येला सध्या छावणीचे स्वरुप आले आहे. अयोध्येतील सर्व बुकिंग सध्या रद्द करण्यात आले आहेत. मात्र, 23 जानेवारीपासून सर्व सामान्य भाविकांना राम मंदिरात रामललाचे दर्शन घेता येणार आहे.

गर्भगृहात मूर्तीची स्थापना

गुरुवारी सायंकाळी संपूर्ण विधीवत मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विविध विधी आणि पूजा करुन मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रामललाची मूर्ती दगडाची असून तिचे वजन 150 ते 200 किलो आहे. ही मूर्ती श्री रामाच्या पाच वर्षांच्या मुलाचे रूप आहे.

अयोध्येत राम मंदिरात भगवान श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी १ लाख लोकं येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शिवाय दररोज ५० हजार लोकं अयोध्येला येण्याची शक्यता आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून यूपी सरकारने प्रशासनाला योग्य ती पाऊले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्व गोष्टींवर नजर ठेवून आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.