रामायण ते वंदे भारत! G-20 साठी येणाऱ्या पाहुण्यांना होणार भारतीय संस्कृती आणि विकासाचे दर्शन

G20 Summit 2023 : शिखर परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन तर होणारच आहे. पण भारत कसा विकसीत होतोय हे देखील पाहायला मिळणार आहे.

रामायण ते वंदे भारत! G-20 साठी येणाऱ्या पाहुण्यांना होणार भारतीय संस्कृती आणि विकासाचे दर्शन
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 12:25 AM

G20 Summit Delhi : राजधानी दिल्लीच्या रस्त्यावरून जात असताना, G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना भारताचे शाश्वत जीवन, सांस्कृतिक वारसा, कला आणि भारत सर्वत्र विकासाच्या मार्गावर चाललेला दिसणार आहे. यासाठी ज्या मार्गांवरून प्रतिनिधींचा ताफा जाणार आहे, त्या सर्व मार्गांवर भिंतींवर चित्रे रंगवण्यात आली आहेत. प्रगती मैदानावर बनवलेले भारत मंडप हे मुख्य ठिकाण असून जवळच्या भैरो मार्ग रेल्वे पुलाखालील भिंतींवर भारतीय रेल्वेने सुंदर कलाकृती बनवल्या आहेत. येथील कलाकृतींमध्ये रामायण, महाभारत आणि विष्णू अवतार पाहायला मिळणार आहे. एवढेच नाही तर देशातील विविध राज्यांतील पारंपरिक नृत्य कला आणि चित्रकलेची झलकही या भित्तीचित्रांमध्ये पाहायला मिळणार आहे.

भारतीय रेल्वेने वॉल पेंटिंगच्या माध्यमातून आधुनिकतेचा प्रवासही दाखवला आहे. इथे तुम्हाला भारतीय रेल्वेच्या सुरुवातीचे चित्र स्टीम इंजिन ट्रेनने बघायला मिळते आणि त्यानंतर आजची आधुनिक वंदे भारत ट्रेन देखील भिंतीवरील पेंटिंगमध्ये दाखवली आहे, जी भारतीय रेल्वेच्या विकासाची कथा सांगते.

जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत हा G-20 चे आयोजन करणार आहे, ज्यासाठी जमिनीपासून आकाशापर्यंत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि अग्निशमन विभागाने तयारी पूर्ण केली आहे. दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असणार आहे ज्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.

अग्निशमन विभागाचे ५०० कर्मचारी तैनात

अतुल गर्ग यांच्या मते, तीन प्रमुख चिंतेची क्षेत्रे आहेत, त्यापैकी एक प्रगती मैदान आहे, दुसरे म्हणजे जिथे परदेशी पाहुणे राहतील आणि तिसरे ते ठिकाण आहे जिथे परदेशी पाहुणे भेट देतील. या मेगा इव्हेंटसाठी अग्निशमन विभागाचे 500 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. अग्निशमन विभागाच्या ३५ गाड्या तैनात करण्यात आल्या असून काही वाहने स्टँडबायवर राहणार आहेत. प्रगती मैदानाच्या आत एक छोटा कंट्रोल रूम बनवण्यात आला आहे. यासोबतच अग्निशमन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.