RBI News on 2000 Note | 2 हजारांच्या नोटांबद्दल सर्वात मोठी बातमी, RBI नोटा परत घेणार

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे.

RBI News on 2000 Note | 2 हजारांच्या नोटांबद्दल सर्वात मोठी बातमी, RBI नोटा परत घेणार
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:11 PM

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा व्यवहारात असणार आहेत. सध्या तरी नोटा चलणात सुरु असतील. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बंद होतील, अशा चर्चा सुरु होत्या. सोशल मीडियावर वारंवार याबाबत चर्चा सुरु व्हायची. तर रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने त्यावर स्पष्टीकरण दिलं जात होतं. 2 हजाराच्या नोटा बंद होणार नाही, असं सातत्याने स्पष्ट करण्यात येत होतं. पण आता रिझर्व्ह बँकेने अधिकृतपणे त्याच दृष्टीकोनाने पाऊल सुरु केल्याचं चित्र दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

2 हजाराच्या जागी आता 1 हजाराची नोट येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि 1 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारकडून त्या जागेवर 2 हजाराच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. या नोटा गेल्या 6 वर्षांपासून चलनात आहेत. पण या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बाजारात फार दिसत नव्हत्या. अगदी कमी प्रमाणात या नोटा दिसत होत्या. अखेर या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बँक त्याऐवजी 1 हजाराच्या नोटा आणतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘ही नोटबंदी नाही’, अर्थतज्ज्ञांचं मत

देशात 2 हजाराच्या नोटा गेल्या तीन वर्षांमध्ये निवडणुकीच्या वेळीत जास्त बाजारात आलेल्या बघायला मिळाल्या आहेत. ऐरव्ही या नोटा जास्त दिसत नव्हत्या. दरम्यान, बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला प्रतिक्रिया देताना हा नोटबंदीचा प्रकार नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार हे रिझर्व्ह बँकेच्या अख्यारीत असतात, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

2 हजाराच्या नोटा जमा करताना बँकेत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण जेव्हा 500 आणि 1000 च्या नोटा बंद झालेल्या तेव्हा बँकेत चांगलीच गर्दी उसळली होती. पण यावेळी ही गर्दी तितकी मोठी नसेल. कारण 2 हजाराच्या नोटा बाजारात फार कमी दिसत आहेत. कुणी या नोटांचा साठा करुन ठेवला असेल तर त्यांना या नोटा आता पुन्हा बँकेत भरावा लागतील हे मात्र नक्की आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.