Extortion threats: व्हिडीओ कॉल रिसिव्ह केला आणि स्क्रीनवर न्यूड मुलगी, 76 वर्षांच्या आजोबांचं त्या दिवसापासून जगणचं बदललं
त्यांच्यासारख्या अनेकांचं जगणं या अशा व्हिडीओ कॉलमुळे त्रासदायक झालेलं आहे. त्यांना व्हिडीओ कॉलवर एका न्यूड मुलीने कॉल केला होता. इतकंच नाही तर त्यांना त्यानंतर हा व्हिडीओ दुसरीकडे टाकू नये यासाठी, खंडणी (extortion )मागण्यात आली.
नवी दिल्ली – दिल्ली सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले 76वर्षांचे आजोबा त्यांचं वानप्रस्थाचं (retired grandfather)आयुष्य सुखाने जगत होते. कधी युमानापार असलेल्या मुलाच्या घरी काही काळ तर कधी गाझियाबादमध्ये असलेल्या दुसऱ्या मुलाच्या घरी ते जाऊन येऊन असत. सामाजिक कामातही अग्रेसर असल्याने त्यांना चांगली प्रतिष्ठाही होती.७ ऑगस्टला त्यांना एक व्हिडिओ कॉल (video call)आला आणि त्यानंतर त्यांचं जगणं अक्षरश: नरकासारखं झालं. त्यांच्यासारख्या अनेकांचं जगणं या अशा व्हिडीओ कॉलमुळे त्रासदायक झालेलं आहे. त्यांना व्हिडीओ कॉलवर एका न्यूड मुलीने कॉल केला होता. इतकंच नाही तर त्यांना त्यानंतर हा व्हिडीओ दुसरीकडे टाकू नये यासाठी, खंडणी (extortion )मागण्यात आली. आजोबांनी दुर्लक्ष केल्यानंतर त्यांना सायबर पोलीस इन्सपेक्टरच्या नावानेही धमक्या देण्यात आल्या.
नेमकं काय घडलं
त्यांना एकदा व्हिडीओ कॉल आला, तेव्हा ते त्यांच्या काही परिचित व्यक्तींसोबत बसलेले होते. त्यावेळी त्यांच्याशी बोलणारा माणूस त्यांना धमकी देत असावा, असे सपष्टपणे जामवत होते. अशावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका मणसाने त्यांचा फोन हिसकावून घेतला. त्यावेळी ते या जाळ्यात अडकल्याचे उघड झाले. या आजोबांनी सांगितले की 7 ऑगस्टला त्यांना पहिल्यांदा व्हिडीओ कॉल आला होता. कॉल रिसिव्ह केल्यावर एक न्यूड मुलगी होती, ती अश्लील हावभाव करीत होती. सुमारे दीड ते दोन मिनिटे हा प्रकार सुरु होता. थोड्यावेळा ने त्या मुलीचा पुन्हा फोन आला. तिने धमकीच्या रुपात या आजोबांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाहीत, तर त्यांच्या कॉन्टक्ट लिस्टमध्ये असलेल्या सगळ्यांना हा व्हिडीओ पाठवेन, अशी धमकीही या मुलीने या आजोबांना दिली. आजोबा घाबरले. त्यानंतर त्यांना जेवणही जाईना, हे सांगायचं कुणाला हा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे ते अस्वस्थ राहू लागले.
सायबर इन्सपेक्टरच्या नावाने धमकावले
एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही 10 ऑगस्टला त्यांना सायबर क्राईम इन्सपेक्टर जितेंद्र कुमार नावाने एक कॉल आला. त्याने कॉवर सांगितले की तुमच्याविरोधात एका मुलीने तक्रार दाखल केली आहे. तुम्हाला भेटायचे आहे. याने हे आजोबा अजून घाबरले. दुसरीकडून तो सायबर क्राईम त्यांना धमकी द्यायला लागला. आजोबांनी घाबरुन फोन ठेवला तर दुसरा कॉल आला. यावेळी दुसरा माणूस होता, तो म्हणाला की तुमच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी यू ट्यूबवर टाकलेला व्हिडीओ डिलिट करण्यासाठी 17,200 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. या आजोबांनी घाबरुन या माणसाने दिलेल्या बँकेच्या खात्यात ती रक्कम जमा केली. त्यानंतर पुन्हा कॉल आला. त्यावेळी सांगण्यात आले की एक व्हिडीओ डिलिट झाला आहे, दुसरा व्हिडीओ डिलिट करण्यासाठी 22 हजार अजून द्यावे लागतील. नेमक्या त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या हातातून फोन काढून घेतला.
ब्लॅकमेलिंग अखेरीस असे संपले
या आजोबांसोबत बसलेल्या व्यक्तीला समोरची व्यक्ती त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे लक्षात आले, त्याने फोन घेऊन स्वताला इन्सपेक्टर म्हणवणाऱ्याला फोनवर भरपूर ऐकवले. त्यावेळी तुम्ही कायदा हातात घेऊ नका, महागात पडेल, असे पलिकडून तो गुन्हेगार सांगत राहिला. मात्र त्या आजोबांसोबत असलेल्याने त्याला चांगलेच सुनावले. त्यानंतर आजोबांना पुन्हा फोन आला नाही. त्यानंतर आजोबांच्या सोबत असलेल्याने सायबर क्राईमला हा सगळा प्रकार फोन करुन कळवला.