Corona | रिलायन्सकडून 500 कोटींची मदत, 50 लाख लोकांची जेवणाची व्यवस्था
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायन्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे (Reliance Announces Contribution to PM Cares Fund). कोरोनाशी सामना करण्यासाठी रिलायन्सने पीएफ रिलीफ फंडला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायन्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे (Reliance Announces Contribution to PM Cares Fund). कोरोनाशी सामना करण्यासाठी रिलायन्सने पीएफ रिलीफ फंडला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रिलायन्स कंपनी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला प्रत्येकी 5 कोटींची मदत करणार आहे. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीने पुढच्या 10 दिवसांसाठी 5 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे (Reliance Announces Contribution to PM Cares Fund).
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी याबाबत घोषणा केली. “मला विश्वास आहे की भारत लवकरच कोरोनावर विजय मिळवणार आहे. या कठीण काळात रिलायन्स कंपनीची संपूर्ण टीम देशासोबत आहे. कोरोनाला संपवण्यासाठी आपण पूर्णपणे मेहनत घेऊ”, असं मुकेश अंबानी म्हणाले.
रिलायन्स कंपनी दररोज एक लाख मास्क बनवत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्त्वपूर्ण भूमिका निभवतात. त्यामुळे रिलायन्स कंपनी मोफत मास्क वाटत आहे. याशिवाय कंपीने देशातील अनेक शहरांमध्ये लाखो लोकांची व्यवस्था केली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायन्स कंपनीने दोन आठवड्यात 100 खाटांचं रुग्णालय तयार केलं आहे. या रुग्णालयात फक्त कोरोनावर उपचार केले जाणार आहे.
दरम्यान, कोरोनाविरोधात लढण्यासाठी अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा कंपनी आणि सामाजिक संस्थेकडून एकूण 1500 कोटींची मदत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ‘पार्ले जी’ या बिस्किट कंपनीने तीन आठवड्यात तीन कोटी बिस्किट पुडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणाकडून किती मदत?
- शिर्डी साईबाबा ट्रस्ट – 51 कोटी
- CRPF अधिकारी – 33.81 कोटी
- मुकेश अंबानी – 5 कोटी
- अभिनेता प्रभास – 4 कोटी
- बॉक्स ऑफिस इंडिया – 3 कोटी
- अल्लू अर्जुन – 1.25 कोटी
- अभिनेता पवनकल्याण – 1 कोटी
- सचिन तेंडुलकर – 50 लाख
- शिवसेना खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
- राष्ट्रवादी खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
- नितीन गडकरी – एक महिन्याचा पगार
- आनंद महिंद्रा – एक महिन्याचा पगार
- भाजप खासदार – एक महिन्याचा पगार
- भाजप आमदार – एक महिन्याचा पगार
संबंधित बातम्या :
कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे दफन की दहन? आयुक्तांचा निर्णय मलिकांनी मागे घ्यायला लावला
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा