Republic Day 2024 : यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाच्या प्रमुखांना आमंत्रण?
Republic Day 2024 Guest : 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाला आमंत्रण दिले आहे. याबाबत एक माहिती पुढे आली आहे. आधी क्वाड संघटनेतील देशांना आमंत्रित केले जाणार असल्याचं बोललं जात होतं. आता आणखी एक माहिती पुढे आली आहे.
Republic Day 2024 : G-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख या शिखर संमेलनासाठी भारतात आले होते. भारत करत असलेली प्रगती आणि भारताची क्षमता सर्व जगाने पाहिली. भारतात आलेल्या पाहुण्यांना सरकारकडून देशभरातील विविध ठिकाणी पाठवण्यात आले. ज्यामुळे संपूर्ण देशाला याचा फायदा होईल. जी-20 नंतर आता 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी ही माहिती दिली आहे.
जो बायडेन G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी देखील भारतात आले होते. जो बायडेन आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. आता अमेरिकेच्या राजदूताने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितले की, G20 शिखर परिषदेच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनासाठी आमंत्रित केले आहे.
2024 मध्ये भारतात क्वाड समिट
भारत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी चार देशाच्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा विचार करत आहे. क्वाड ही चार देशांची संघटना आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे त्याचे सदस्य आहेत. भारत 2024 मध्ये क्वाड समिटचे यजमानपद भूषवणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करण्याची परंपरा आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशाच्या प्रमुखांना आमंत्रित केले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विशेष असे आमंत्रण दिले जाते. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात चांगले झाले आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वाढली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी जो बायडेन यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होणार आहेत.