तुर्कस्तानमध्ये भूकंपाची शक्यता व्यक्त करणाऱ्या संशोधकांची आता भारताबाबतही मोठी भविष्यवाणी

भारतीय उपखंडात मोठ्या भूकंपांची शक्यता डच संशोधकाने वर्तवली आहे. फ्रँक यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह हिंद महासागर क्षेत्र (IOR) पर्यंत मोठ्या भूकंपांची भविष्यवाणी केली आहे.

तुर्कस्तानमध्ये भूकंपाची शक्यता व्यक्त करणाऱ्या संशोधकांची आता भारताबाबतही मोठी भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 6:25 PM

मुंबई : तुर्किस्तानमध्ये भयंकर भूकंप झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास २९ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीरियामध्ये देखील भूकंपमुळे जीवितहानी झाली आहे. नेदरलँड्सचे प्रसिद्ध संशोधक फ्रँक हुगरबीट्स यांनी 3 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि त्याच्या शेजारच्या प्रदेशांमध्ये भयंकर भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांची ही भविष्यवाणी तीन दिवसांनी खरी ठरली. 6 फेब्रुवारीला तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपाने सर्वकाही उद्ध्वस्त झाले. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 35,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या ( Turkey Earthquake ) भूकंपाबाबत आधीच अंदाज व्यक्त करणाऱ्या डच संशोधकाने आता भारताबाबतही धक्कादायक भविष्यवाणी ( Earthquake Prediction in india ) केली आहे.

तुर्किस्तान आणि सीरियामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरूच आहे. या दोन देशांमध्ये झालेल्या भूकंपामुळे जगभरातील लोकांना धक्का बसला आहे. नैसर्गिक आपत्तींशी सामना करण्यासाठी जगभरातील लोकं प्रार्थना करत आहेत.

भारतीय उपखंडात मोठा भूकंप होण्याची शक्यता

फ्रँक हूगरबीट्स यांनी असं भाकीत केलंय की, भारतीय उपखंडातही लवकरच मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह हिंद महासागर क्षेत्र (IOR) पर्यंत मोठ्या भूकंपांची भविष्यवाणी केली आहे.

हा भूकंप अफगाणिस्तानातून सुरू होऊन हिंदी महासागरात जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने या अंदाजाबाबत अजूनही काही संभ्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संशोधकाच्या मते, 2001 प्रमाणे या भूकंपाचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे, परंतु याची खात्री नाही.

अफगाणिस्तानमध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता

जोस क्विंटेन नावाच्या एका ट्विटर युजरने ही माहिती शेअर करत म्हटले आहे की, तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपांची भविष्यवाणी करणारे डच संशोधक फ्रँक हुगरबीट्स यांनी आता  अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे.

या भूकंपाचा भारताबरोबरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरही परिणाम होणार आहे. फ्रँक म्हणतात की भूकंपाच्या अंदाजाशी संबंधित हे तंत्रज्ञान इतर देशांसोबत शेअर करणे हे एक आव्हान आहे.

भूकंपामुळे 80,000 लोक जखमी

तुर्किस्तान आणि सीरियातील भूकंपानंतर कडाक्याच्या थंडीत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी गेल्या ५ दिवसांपासून सतत काम करत आहेत. भारतातून देखील एनडीआरएफची टीम बचाव मोहिमेत सहभागी झाली आहे. शनिवारी 12 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले. भूकंपामुळे किमान 80,000 लोक जखमी झाले आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.