Tripura Riots: सलग सातव्या दिवशी त्रिपुरामध्ये हिंसाचार सुरुच; हिंदुत्ववादी संघटनांकडून मशिदींवर हल्यांचा आरोप
हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक मशिदी, मुस्लिम लोकांचा घरे आणि दुकाने पेटवल्याचा आरोप होतोय. काही दिवसांपुर्वी बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील हिंसाचारानंतर हे हल्ले सुरू झाले.
अगरतळाः सलग सातव्या दिवशीही त्रिपुरामध्ये दंगल उसळली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक मशिदी, मुस्लिम लोकांचा घरे आणि दुकाने पेटवल्याचा आरोप होतोय. काही दिवसांपुर्वी बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील हिंसाचारानंतर हे हल्ले सुरू झाले. त्रिपुरा राज्य आणि बांगलादेशची सीमा एक आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एक मशीद आणि काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि काही दुकाने पेटवण्यात आली. विरोधकांनी या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. पुढच्या वर्षी होण्याऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवीवर तर हे हल्ले नाहीत ना? असा प्रश्न विचारला जातोय. (riots in tripura against muslims and mosques by hindu outfits)
निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू
त्रिपुरामध्ये पुढील महिन्यात महापालिका निवडणुका आहेत आणि सगळेया राजकीय पक्षांनी तयारी सुरू आहे. त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे. काल भाजपने राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या चौकशीसाठी अल्पसंख्याक सेलकडून पाच सदस्यीय टीम तयार केली आहे. तृणमूल काँग्रेसनेही त्रिपुरातील राजकीय हालचली तीव्र केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधातल्या विजयानंतर टीएमसीने त्रिपुरा सारख्या छोट्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी दोनदा राज्याला भेट देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली.
काल राहूल गांधींनी त्रिपुरामध्ये भडकलेल्या दंगलीबद्दल ट्विट केलं आणि त्रिपुरामध्यल्या मुस्लिम बांधवांविरोधात होणा्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला.
त्रिपुरा में हमारे मुसलमान भाइयों पर क्रूरता हो रही है। हिंदू के नाम पर नफ़रत व हिंसा करने वाले हिंदू नहीं, ढोंगी हैं।
सरकार कब तक अंधी-बहरी होने का नाटक करती रहेगी? #TripuraRiots
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 28, 2021
हिंदू संघटनांकडून हल्ल्यांची सुरूवात
बांगलादेशातील दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू झाली. बांगलादेशमध्ये जवळपास 70 अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतुर त्रिपुरामधल्या हिंदू संघटनांनी मशिदी, मुस्लिम लोकांचा घरे आणि दुकानांवर हल्ल्यांना सुरूवात केली.
21 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील घटनांच्या विरोधात गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांची रॅली झाली होती. या रॅलीमध्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी चकमक होऊन तीन पोलिस कर्मचार्यांसह 15 जण जखमी झाले होते. या घटनांनी त्रिपुरामधल्या कर्फ्यूचे निर्बंध मोडले होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला, विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एक मशीद आणि काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि काही दुकाने पेटवण्यात आली. उत्तर त्रिपुरामध्या ही धटना घडली.
Under @BjpBiplab‘s #DuareGundaRaj, attack on political opponents is setting new records!
Physically manhandling a sitting female Rajya Sabha MP, @SushmitaDevAITC is BEYOND SHAMEFUL & POLITICAL TERRORISM by @BJP4Tripura goons!
The time is near. People of Tripura will answer!
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) October 22, 2021
Other news:
जम्मू काश्मीर: डोडा जिल्ह्यात मिनीबस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!
Pm Narendra Modi | G20 शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी रोमला रवाना, 12 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचा दौरा
riots in tripura against muslims and mosques by hindu outfits