BREAKING : योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर बॉम्ब? सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल, घडामोडींना वेग
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विषयी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब असल्याची अफवा पसरली आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विषयी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अफवा समोर आल्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचं निवसस्थान परिसरात अतिशय बारकाईने आणि काटेकोरपणे शोध मोहिम सुरु आहे. पण बॉम्बचं वृत्त ही अफवाच होती, अशी प्राथमिक माहिती समोर येतेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर बॉम्ब असल्याचा फोन लखनऊ पोलिसांना आला होता. त्यानंतर तातडीने पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखत इतर सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफोटा योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर दाखल झाला.
घटनास्थळी तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं. या पथकाकडून तातडीने शोध मोहिम सुरु झाली. पण या पथकाला बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे याबाबतची माहिती ही खोटी होती. संबंधित माहिती देणारा फोन हा फेक होता हे स्पष्ट झालंय.
विशेष म्हणजे अशाप्रकारचे फेक कॉल येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील अशाप्रकारचे अनेक फेक कॉल भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये देखील अशाप्रकारचा फोन आला होता. या फेक कॉलमधून ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण तो कॉल फेक होता हे नंतर स्पष्ट झालं होतं.