रशियाकडून युक्रेनमध्ये तूर्तास युद्धविराम, परदेशी नागरिकांना मायदेशी जाण्यासाठी मोठा निर्णय
गेल्या दहा दिवसांपासून रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये हाहा:कार उडाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे क्यीवसह युक्रेनमधील अनेक महत्वाच्या शहरांचं मोठं नुकसान झालं आहे. गोळ्यांचा वर्षाव आणि मिसाईल अटॅक्स यामुळे अनेक घरं आणि इमारतींची राखरांगोळी झाली आहे.
क्यीव: गेल्या दहा दिवसांपासून रशियाने युक्रेनवर हल्ले (Russia Ukraine War) सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये हाहा:कार उडाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे क्यीवसह युक्रेनमधील अनेक महत्वाच्या शहरांचं मोठं नुकसान झालं आहे. गोळ्यांचा वर्षाव आणि मिसाईल अटॅक्स यामुळे अनेक घरं आणि इमारतींची राखरांगोळी झाली आहे. रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसल्याने लोक जीव मुठीत घेऊन लपून बसले आहेत. अनेकजण बंकर्समध्ये लपून बसले आहेत. तसेच परदेशातील अनेक विद्यार्थी आणि नागरिकही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनच्या सीमेवर या परदेशी नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे या नागरिकांना मायदेशी सुखरूप परतता यावं म्हणून जगातील अनेक देशांनी रशियावर (Russia) दबाव वाढवला होता. त्यामुळे रशियाने अखेर काही काळापुरता युद्धविराम जाहीर केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी `11.30 वाजता हा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. पाच तासांसाठीचा हा युद्धविराम (ceasefire) असणार आहे. परदेशी नागरिकांना मायदेशी जाता यावे, त्यांच्यासाठी ग्रीन कोरिडोअर तयार करता यावा म्हणून हा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे अनेक परदेशी नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले होते. या नागरिकांना त्यांच्या देशात सुखरूप पाठवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा झाली. दोन टप्प्यात झालेल्या या चर्चेनंतर रशियाने युक्रेनमध्ये तूर्तास युद्धविराम जाहीर केला आहे. युद्धविराम काळात रशियाकडून युक्रेनवर कोणताही हल्ला होणार नाही. तसेच या काळात युक्रेनकडूनही रशियावर हल्ला होणार नाही. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारत, पाकिस्तान आणि चीनसह सर्वच देशातील नागरिकांना आपल्या देशात निर्भयपणे परतता येणार आहे.
या दोन शहरात युद्धविराम
मारियुपोल और वोल्नोवख शहरात मानवी साखळी तयार करून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धविराम करण्यात आला आहे. पाच तासांसाठी हा युद्धविराम असेल.
ह्युमन कोरिडोर बनवणार
युद्धविरामानुसार युक्रेनच्या वोल्नोवाखाच्या डीपीआर शहरात ह्युमन कॉरिडोर बनवण्यात येणार आहे. त्यानुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काडलं जाणार आहे. या ठिकाणी युक्रेनची सैना तैनात असेल.
युद्धविराम म्हणजे काय?
युद्धविराम म्हणजे युद्ध न करण्याची करण्यात आलेली घोषणा. युद्ध काळात दोन्ही देश परस्पर संमतीने अटी आणि शर्तींवर युद्धविराम जाहीर करतात. तसा करार करतात. युद्धविरामाची एक ठरावीक मर्यादा ठरवलेली असते. त्याकाळात कोणत्याही देशांकडून एकमेकांवर हल्ला न करण्याची अट घालण्यात आलेली असते. तसेच या कराराचं उल्लंघन करणाऱ्या देशावर कठोर कारवाईही केली जाते.
Russia declares ceasefire in Ukraine from 06:00 GMT (Greenwich Mean Time Zone) to open humanitarian corridors for civilians, reports Russia’s media outlet Sputnik
— ANI (@ANI) March 5, 2022
संबंधित बातम्या:
युद्धात युक्रेन संपलं तर युरोप सुध्दा टिकणार नाही; झेलेन्स्की यांच्या नव्या मॅसेजमुळे युरोपात खळबळ
रशिया युक्रेन युद्धाची झळ राष्ट्रीय कंपन्यांना, अँपल, गुगलसह अनेकांनी गाशा गुंडाळला