Gyanvapi:शंकराचार्यांच्या आदेशाचं होणार पालन, ज्ञानवापीत शिवलिंगाची पूजा करणार संत, ४ जूनला वाराणसीत पोहचणार

काही दिवसांपूर्वी द्वारकापीठाचे शंकाराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी मोठे वक्तव्य केले होते. ज्ञानवापीत प्रकट झालेल्या भगवान आदि विश्वेश्वर यांची पूजा सुरु केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे सनातन धर्मातील मोठे आचार्य मानले जातात. तसेच धर्माचा विचार केल्यास काशी उत्तर क्षेत्रात येते. शंकराचार्य हे उत्तर भागातील सर्वात प्रमुख धर्मगुरु आहेत. याच कारणामुळे शंकराचार्यांच्या या आदेशामुळे साधूसंतांमध्ये उत्साह संचारला आहे.

Gyanvapi:शंकराचार्यांच्या आदेशाचं होणार पालन, ज्ञानवापीत शिवलिंगाची पूजा करणार संत, ४ जूनला वाराणसीत पोहचणार
Gyanvapi Shivling
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 9:13 PM

वाराणसी – ज्ञानवापीच्या वादात आता देशातील संतही उतरले आहेत. ४ जून म्हणजेच रविवारी ज्ञानवापीत साडपडलेल्या आदि विश्वेश्वराच्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी साधू-संत एकत्र येणार आहेत. वाराणसीतील केदार घाटावरील विद्य़ा मठाचे स्वामी अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे पोलीस आणि प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी द्वारकापीठाचे शंकाराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी मोठे वक्तव्य केले होते. ज्ञानवापीत प्रकट झालेल्या भगवान आदि विश्वेश्वर यांची पूजा सुरु केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे सनातन धर्मातील मोठे आचार्य मानले जातात. तसेच धर्माचा विचार केल्यास काशी उत्तर क्षेत्रात येते. शंकराचार्य हे उत्तर भागातील सर्वात प्रमुख धर्मगुरु आहेत. याच कारणामुळे शंकराचार्यांच्या या आदेशामुळे साधूसंतांमध्ये उत्साह संचारला आहे.

ज्यांना शिव माहीत नाही ते शिवलिंगाला कारंजाच म्हणणार

शंकराचार्य सध्या मध्य प्रदेशात आहेत. त्यांच्यासेवेसाठी आत्तापर्यंत तिथेच होतो असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले आहे. शंकराचार्यांच्या आदेशानेच वाराणसीत आल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्ञानवापीच्या मशिदीतील वजूखान्यात शिवलिंग मिळाले की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असे सांगण्यात येते आहे. मात्र आमचे म्हणणे आहे की, असेही सांगितले जात नाहीये की ते शिवलिंग नाहीये. एक पक्षकार शिवलिंग म्हणतायते, दुसरे तो कारंजा असल्याचे सांगतायेत. दोघेही एकच बाब सांगत आहेत. जेव्हा आम्ही शिव शंकर म्हणतो, तेव्हा त्यांच्या माथ्यावर गंगा आहेच. सनातन धर्मात शिव ही एकच देवता आहे, जिच्या माथ्यातून पाणी येते. ज्यांना शिव माहित नाही, ते त्यांच्या मूर्तीला कारंजाच म्हणतील.

पूजापाठ करणे आवश्यक

ज्ञानवापीत भगवान शिव सापडले आहेत तर त्यांचा अभिषेक, शृंगार, पूजा हे करमे अत्यावश्यक आहे. ज्या भगवंतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते, ती तीन वर्षांच्या बालकासारखी असते, असे धर्म सांगतो. त्या मूर्तीच्या सेवेसाठी सेवेकरी ठेवण्याचीही गरज असते. मात्र देशात हिंदूंच्या भावनांचा विचार न करता, ४ जुलैपर्यंत कोर्टाने थांबण्यास सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

पूजा करणे हे कर्तव्य

जर आमच्या डोळ्यासमोर भगवंत प्रगटले आहेत, तर त्यांची पूजा आणि सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. असे केले नाही तर आम्हाला पाप लागेल. त्यामुळेच धर्म आणि शास्त्राच्या मार्गावर चालत गुरु शंकराचार्यांच्या आदेशाने भगवान आदि विश्वेश्वराची नियमित पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे त्यांनी सांगितले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.