Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: सलमान खान माफी मागणार नाही…लॉरेन्स बिश्नोई गँगला दिले सडेतोड उत्तर

Salman Khan and Lawrence Bishnoi: सलमानने माफी मागावी. परंतु सलमान खानने गुन्हा केला नाही, त्यामुळे तो माफी मागणार नाही. त्याने माफी मागितली तर त्याचा अर्थ होईल, त्याने गुन्हा केला आहे, असे सलीन खान यांनी म्हटले आहे.

Salman Khan: सलमान खान माफी मागणार नाही...लॉरेन्स बिश्नोई गँगला दिले सडेतोड उत्तर
salim khan, salman khan
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 2:59 PM

Salman Khan and Lawrence Bishnoi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. अभिनेता सलमान खानला मदत केल्यामुळे बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई गँगने केला. तसेच जो सलमानची मदत करणार त्यांच्याबाबत असाच प्रकार होणार असल्याची धमकी दिली. सलमान खान याने माफी मागवी, अशी मागणी लॉरेन्स बिश्नोई गँग आणि बिश्नोई समाजाकडून होत आहे. परंतु सलमान माफी मागणार नाही, असे सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनी म्हटले आहे. सलमानने कधी कॉकरोच मारले नाही तर तो कळविटची शिकार काय करणार? त्याने शिकारच केली नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले सलीम खान

सलमान खान यांना धमकी मिळत असल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच दोन कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करुन सलमान खानने बुलेट प्रुफ गाडी घेतली आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी म्हटले आहे की, सलमान खान माफी मागणार नाही. त्याने कळविटचा शिकार केली नाही. त्याने कधी कॉकरोचसुद्धा मारला नाही. आम्ही अहिंसा मानणारे लोक आहेत.

आम्ही नेहमी इतरांना मदत करतो…

सलीम खान यांनी म्हटले की, लोक आम्हाला म्हणतात तुम्ही नेहमी जमिनीवर पाहतात. तुम्ही विनम्र आहेत. आम्ही त्यांना सांगतो, आम्हाला भीती असते की आमच्या पायाखाली एखादी किडा आला तर…त्याचा विचार आम्ही करतो. मानव म्हणून आम्ही नेहमी लोकांना मदत करतो. कोरोनानंतर मदत कमी झाली. परंतु त्यावेळेस लांब रांगा लागतात. कोणाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर त्याला आम्ही मदत करतो. दिवसभरत ४०० पेक्षा जास्त लोकांना आम्ही मदत करत असतो.

हे सुद्धा वाचा

लोक म्हणतात, सलमानने माफी मागावी. परंतु सलमान खानने गुन्हा केला नाही, त्यामुळे तो माफी मागणार नाही. त्याने माफी मागितली तर त्याचा अर्थ होईल, त्याने गुन्हा केला आहे, असे सलीन खान यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा…

550 वर्षे जुने नाते… बिष्णोई समाज काळवीटचा का करतो इतका आदर, सलमान खानने तोडले होते 9 नियम

स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....