बिहारसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून फक्त संजय निरुपम यांचा समावेश
30 जणांच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना डावलून काँग्रेसने स्टार प्रचारकांमध्ये केवळ निरुपम यांचा समावेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 30 जणांच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना डावलून काँग्रेसने स्टार प्रचारकांमध्ये केवळ निरुपम यांचा समावेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (sanjay nirupam star campaigner in bihar election)
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी, मीरा कुमार, गुलाम नबी आझाद, प्रियांका गांधी, शक्तीसिंह गोहिल, मदन मोहन सिंग, अशोक गेहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंग, भुपेश बघेल, तारिक अन्वर, रणदीपसिंह सुरजेवाला, शकील अहमद, शत्रुघ्न सिन्हा, निखिल कुमार, सचिन पायलट, प्रमोद तिवारी, अखिलेश प्रसाद सिंह, मोहम्मद जावेद, राज बब्बर, किर्ती आझाद, संजय निरुपम, उदित राज, इम्रान प्रतापग्रही, प्रेमचंद शर्मा, अनिल शर्मा, अजय कपूर आणि विरेंद्रसिंह राठोड आदी नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम हे राज्यातील आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत असतात. खासकरून शिवसेनेवर त्यांनी तिखट शब्दांत टीका केली आहे. असं असतानाही निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. शिवाय काँग्रेसच्या राज्यातील एकाही माजी केंद्रीय मंत्र्याला किंवा माजी मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निरुपम हे राज्यातील आघाडी सरकारवर टीका करत असले तरी पक्षातील त्यांचं स्थान आढळ असल्याचं या निमित्ताने दिसून येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sanjay nirupam star campaigner in bihar election)
Congress’ star campaigners for #BiharElections
30 top leaders include Mrs Sonia Gandhi, Dr Manmohan Singh, Mr @RahulGandhi , Ms @priyankagandhi , Mr @ShatruganSinha , Mr @sanjaynirupam , Mr @ShayarImran , Mr @pramodtiwari700 , Ms @meira_kumar , Mr @KirtiAzaad , Mr @itariqanwar pic.twitter.com/US4XTufiqB
— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) October 10, 2020
संबंधित बातम्या:
“हिंदुत्वाच्या मुद्यावर लढवणार बिहार निवडणूक” – शिवसेना खासदार अनिल देसाई यांची माहिती
वंचित बहुजन आघाडी बिहार निवडणूक लढवणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
निवडणूक प्रचारात गळाभेटीवर बंदी; बिहार सरकारचे फर्मान
(sanjay nirupam star campaigner in bihar election)