VIDEO: महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं; ‘ऑपरेशन गंगा’वरून राऊतांचा केंद्राला टोला

रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे.

VIDEO: महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर 'ऑपरेशन सह्याद्री' असतं; 'ऑपरेशन गंगा'वरून राऊतांचा केंद्राला टोला
महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर 'ऑपरेशन सह्याद्री' असतं; 'ऑपरेशन गंगा'वरून राऊतांचा केंद्राला टोला
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 1:26 PM

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine Crisis) अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा (operation ganga) सुरू केलं आहे. केंद्र सरकारच्या या ऑपरेशन गंगावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांना मायदेशी आणलंच पाहिजे. पण त्यासाठी जाहिरातबाजी कशाला? निवडणुका आहेत म्हणून ऑपरेशन गंगा सुरू आहे. पंजाबमध्ये निवडणुका झाल्या. पण तिथेही निवडणुका असत्या तर या ऑपरेशनला अमृतसरमधील धार्मिकस्थळाचं नाव दिलं गेलं असतं. महाराष्ट्रात असत्या तर ऑपरेशन सह्याद्री असं म्हटलं असतं, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. सरकारने राजकारण आणि प्रपोगंडा बाजूला ठेवून याकडे लक्ष घातलं पाहिजे. मग सरकार असो किंवा विरोधक यांनी अशा परिस्थितीचं भांडवल करू नये, असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.

आतापर्यंत जगात अनेक युद्धे झाली. इराकपासून आफगाणिस्तानपर्यंत. पण अशा प्रकारे भारतीय विद्यार्थ्यांवर कधीच अत्याचार झाले नव्हते. एखाद्या देशाला मी दोष देत नाही. हे रशियाने लादलेले युद्ध आहे. आपण तटस्थ आहोत. इराणहूनही यापूर्वी आपण आपल्या नागरिकांना आणलं आहे. आपण एअर लिफ्टिंग केलं आहे. पण युक्रेनमध्ये आपल्या देशातील मुलांचा आक्रोश पाहतोय ते सरकारचं फेल्युअर आहे, असं संजय राऊत म्हणाले.

याला राष्ट्रीय बाणा म्हणत नाहीत

शंभर दीडशे मुलांना आणून ऑपरेशन गंगा अशी जाहिरात करत आहेत. निवडणुका आहेत म्हणून ऑपरेशन गंगा सुरूय. जर पंजाबमध्ये निवडणुका असत्या तर वेगळं नाव असतं. आता पंजाबमध्ये निवडणुका झाल्यात म्हणून. नाही तर अमृतसरमधील धार्मिकस्थळाचं नाव घेऊन ऑपरेशन केलं असतं. महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ऑपरेशन सह्याद्री केलं असतं. गुजरातमध्ये असत्या तर ऑपरेशन सोमनाथच्या नावानं ही मोहीम राबवली असती. हे निवडणुकीचं राजकारण बंद केलं पाहिजे. देशाची मुलं संकटात असताना निवडणुका, प्रचार आणि प्रसार दिसत असेल तर त्याला राष्ट्रीय बाणा म्हणत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

राजकारण आणि प्रपोगंडा बाजूला ठेवा

बॉर्डवर विद्यार्थ्यांवर मारहाण होत आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत, अन्न धान्य संपलं आहे. या पूर्वी अशी परिस्थिती झाली नव्हती. सरकारने राजकारण आणि प्रपोगंडा बाजूला ठेवून याकडे लक्ष घातलं पाहिजे. मग सरकार असेल किंवा विरोधक यांनी त्याचं भांडवल करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

दानवेंनी चिंता करू नये

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी 2024मध्ये विरोधकांचं नेतृत्व कोण करणार? असा सवाल केला होता. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षाचं नेतृत्व कोण करेल हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. आमच्याकडे नेतृत्वाचा प्रश्न नसून परिवर्तनाचा आहे. परिवर्तन होईल आणि सर्वमान्य नेता नेमला जाईल. त्यात अडचण नाही. 2024मध्ये बदल होणार हे निश्चित झालं आहे. रावसाहेब दानवेंसारख्या नेत्यांनी मनाशी पक्क केलं आहे. म्हणून ते आम्हाला नेता कोण? असं विचारत आहेत. नेता होईल ना. नेता महाराष्ट्रातलाही होऊ शकतो. दानवे किंवा भाजपला चिंता करण्याची गरज नाही. नेता तयार होतो. जनतेतून नेता तयार होतो, असं ते म्हणाले.

संभाजीराजेंनी टोकाची भूमिका घेऊ नये

खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका सकारात्मक आहे. छत्रपती आमचेही आहेत. जास्त आमचेच आहेत. त्यांच्याशी आमचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. चर्चेतून त्यांनीच मार्ग दिला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: भाजपने नवे ‘शिवव्याख्याते’ निर्माण केले, संजय राऊतांचा खोचक टोला

30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर मारला नाही; वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल

Maharashtra News Live Update : उस्मानाबादेत राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.