Sanjay Raut ED : अलिबाग, मुंबईतली संपत्ती जप्त, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, तर भाजपला संपत्ती दान करतो

sanjay raut news: शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने (ed) जप्त केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे.

Sanjay Raut ED : अलिबाग, मुंबईतली संपत्ती जप्त, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, तर भाजपला संपत्ती दान करतो
अलिबाग, मुंबईतली संपत्ती जप्त, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, तर भाजपला संपत्ती दान करतोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 2:55 PM

नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने (ed) जप्त केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग (money laundering) झालेलं नाही. 2009मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात, असं सांगतानाच कारवाई झाली. ठिक आहे. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. त्यातून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणती प्रॉपर्टी? 2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जागा आणि घर आहे ते. याबाबत कधी कुणी आमची चौकशी केली नाही. विचारणा केली नाही. माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपचे लोक उड्या मारत आहेत

2009 म्हणजे किती वर्ष झालं? अलिबागची ती जागा एक एकरही नाही. माझ्या पत्नीच्या किंवा तिच्या नात्यातील लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोट्या छोट्या जागा आहेत. त्यात ईडीला मनी लॉन्ड्रिंग दिसायला लागलं. राजकीय सूड आणि बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊन कारवाया जातात हे पाहिलं. आमचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं. भाजपचे लोक उड्या मारत आहेत. फटाके फोडत आहेत. मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

8 फ्लॅट जप्त

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut ED Action : मोठी बातमी ! संजय राऊतांची मुंबई आणि अलिबागमधली संपत्ती जप्त, ED च्या कारवाईनं खळबळ

Amit Raj Thackeray: ‘शिवतीर्था’वर पाळणा हलला, मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ; राज ठाकरे झाले आजोबा

Karnataka : राज ठाकरेंचं लोण कर्नाटकात पोहोचलं, मशिदीवरचे भोंगे बंद करण्याची भाजपच्या मंत्र्याची मागणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.