मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट; संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद, पण…

केजरीवाल म्हणतात, अदानी हा चेहरा आहे. अदानीचे सर्व पैसे मोदींचे आहेत. त्याचा तपास व्हावा. कोट्यवधीचा भ्रष्टाचार असताना मोदी सर्व गोष्टीवर बोलतात पण त्यावर बोलत नाही. 20 हजार कोटींवर बोलत नाही. उत्तर द्या, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट; संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद, पण...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:54 AM

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल डीलिट ही पदवी देण्यता आली आहे. शिंदे यांना डॉक्टरेट मिळाल्याने त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही शिंदे यांचं अभिनंदन करतानाच त्यांना टोलेही लगावले आहे. एकनाथ शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद आहे. पण त्यांनी आता स्वत:वरच शस्त्रक्रिया केली पाहिजे, असा चिमटा काढतानाच वीर सावरकर हे कोणत्या बोटीतून कोणत्या बंदरावर गेले होते. हे डॉक्टरांना आताच फोन करून विचारा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

ऑपरेशनचं आम्हाला सांगू नका आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा. तुम्हाला मुका मार बसत राहील. डॉक्टरक्या महाराष्ट्रात पायलीला पन्नास मिळतात. प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरक्या मिळत आहेत हा देशाचा अनुभव आहे. अशा प्रकारे डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ज्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत त्यांना तुम्ही डॉक्टरेट कशी देता? तुमच्या कोणत्या फायली अडकलेल्या आहेत. त्यासाठी हे करावं लागतं? मी कोणावर आरोप करत नाही, असं संजय राऊत म्हणाले. काल बहुतेक सामान्य नागरिकाने मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महान कार्यासाठी त्यांना डॉक्टरेट दिलेली दिसते, असा चिमटाही त्यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

एकजूट कायम

सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेससोबत झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. आमची नाराजी आम्ही दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे मांडली आहे. आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मिटिंगला गेलो नव्हतो. हे खरं आहे. पण आमची एकजूट कायम राहिल. महाराष्ट्रात आणि देशात ही एकजूट राहील. महाविकास आघाडी कायम राहील. आमचे मुद्दे जिथे पोहोचवायचे तिथे पोहोचवले आहेत. त्यातून आमचं समाधान झालं आहे, असं राऊत म्हणाले.

प्रश्नांवर प्रश्न

गौतमी अदानी महात्मा आहे की संत आहेत? राहुल गांधी यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यावर का बोलत नाही? केजरीवाल यांनी जी माहिती दिली त्यावर का बोलत नाही? भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आम्ही जेपीसीची मागणी केली त्यावर का बोलत नाही? तुमच्या आजूबाजूला कोण बसलंय ते पाहा. अदानी तुमचा कोण लागतो? सर्व विरोधी पक्षाचे नेते भ्रष्टाचारी म्हणता, मग तुमचाही हिशोब द्या. महाराष्ट्रातील सरकार कसे बनले ते सांगा? दिल्लीत काय होतंय? केजरीवाल यांचं सरकार पाडण्यासाठी किती पैसा खर्च होतोय? कुठून पैसा येतोय? केसीआरचे सरकार पाडण्यासाठी काय चाललंय? ईडी आणि सीबीआय कुणासाठी आहे? फक्त आमच्यासाठीच का? पीएम केअर फंडाचं ऑडिट करणार का?, असे सवाल त्यांनी केले.

अदानीच्या मागे का?

हे लोक घाबरून गेले आहेत. लोकांमध्ये चीड आहे. लोक रस्त्यावर येत आहेत. जे इस्रायलमध्ये झालं ते देशात होणार आहे. बदलाचं राजकारण सुरू आहे. बदला कुणाचा घेत आहेत? का घेत आहेत? बदला घेण्यासाठी अदानीला का वाचवत आहेत? बदला घेण्यासाठी ते देश लुटणाऱ्या अदानीच्या मागे का उभे आहात? हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.