जगभरातील विविध क्षेत्रातील गुजराती अहमदाबादेत येणार; प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन
गुजरातचं नाव उंचावणारे विविध क्षेत्रातील यशस्वी गुजराती गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकवटणार आहेत. येत्या 10 फेब्रुवारी रोजी प्रवासी गुजराती दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसऱ्यांदा अहमदाबादमध्ये हा सोहळा पार पडत आहे. . AAINA आणि TV9 नेटवर्कने हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून अनिवासी गुजराती काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अहमदाबाद | 8 फेब्रुवारी 2024 : अहमदाबाद पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. अहमदाबादमध्ये प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शनिवारी 10 तारखेला गुजराती पर्व होणार आहे. 2022मध्ये पहिल्या प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला जगभरातील यशस्वी गुजराती उद्योगपती, सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आले होते. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला होता. यंदा पुन्हा एकदा जगातील 40 देशातील 1500 हून अधिक प्रतिभावंत गुजरातींना एका मंचावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे या दिमाखदार सोहळ्याकडे केवळ गुजरातचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.
गुजरातचं नाव जगात गाजवणाऱ्या गुजरातींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. TV9 नेटवर्क आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स इन नॉर्थ अमेरिका म्हणजेच AIANAच्या वतीने प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या जगातील यशस्वी गुजरातींना एका मंचावर आणण्यात येणार आहे. पुन्हा एकदा येत्या 10 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्येच या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
3000 प्रतिभावंतांची मांदियाळी
विदेशात राहत असूनही गुजराती लोकांनी आपल्या मातीची नाळ तोडलेली नाही. आजही त्यांचं गुजरातवर तितकच प्रेम आहे. त्यामुळे जगभर विखूरलेला आणि ग्लोबल झालेला गुजराती समाज या निमित्ताने अहमदाबादमध्ये एकवटणार आहे. येत्या 10 फेब्रुवारी रोजी 40 देशातील 20 राज्यांतील 3000 हून अधिक प्रतिभावंत गुजराती लोक अहमदाबादच्या या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला जगभरातील यशस्वी राजकारणी, अध्यात्मिक गुरू, कलावंत, साहित्यिक, फिल्मी कलाकार, उद्योजक आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवर येणार आहेत.
AAINA आणि TV9 चे आयोजन
1500 हून अधिक एनआरआयच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. यावेळी हे सर्व अनिवासी गुजराती संवाद साधणार आहेत. आपल्या संघर्ष आणि यशाची गाथा सांगणार आहेत. तसेच गुजराती लोकांनी कशा प्रकारे प्रगती केली पाहिजे, जगात सध्या काय चाललं आहे, आपण कुठल्या स्टेजला आहोत याची माहितीही ते देणार आहेत. तसेच तरुणांनी काय केलं पाहिजे? तरुणींनी काय केलं पाहिजे? याचं मार्गदर्शनही या भव्य कार्यक्रमात देण्यात येणार आहे. AAINA आणि TV9 नेटवर्कने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.