Covishield: केंद्राकडून नवी ऑर्डर नाही, सीरम लसीचं उत्पादन 50 टक्के घटवणार

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) पुढील आठवड्यापासून कोविशिल्ड (Covisheild) लसीचं उत्पादन 50 टक्केंनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Covishield: केंद्राकडून नवी ऑर्डर नाही, सीरम लसीचं उत्पादन 50 टक्के घटवणार
Covishield vaccine
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 12:49 PM

पुणे: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) पुढील आठवड्यापासून कोविशिल्ड (Covisheild) लसीचं उत्पादन 50 टक्केंनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) अद्याप कोणतीही ऑर्डर नसल्याचंही सीरमकडून सांगण्यात आलं आहे. मागणी पेक्षा उत्पादन जास्त असल्यान कोविशिल्ड लसीची निर्मिती कमी प्रमाणात करणार असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आमच्याकडे केंद्र सरकारनं नोंदवलेल्या ऑर्डर्स पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण करणार असल्याचंही सीरमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं केंद्र सरकारला पत्र लिहून किती प्रमाणात लसी हव्या आहेत, यासंदर्भात माहिती हवी असल्याचं कळवलं आहे. सीएनबीसी 18 नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सीरम एका महिन्याला किती लसी उत्पादित करते

सीरम इन्स्टिट्य़ूट ऑफ इंडिया एका महिन्याला 25 ते 27 कोटी डोसची निर्मिती करते. पुनावाला यांनी ऑक्टोबरमध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये ते 24 कोटी डोसची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं होतं.

सुरुवातील कंपनी एका महिन्याला 10 ते 11 कोटी डोस प्रति महिना बनवत होती. नोव्हेबंरपासून जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स मोहिमेअंतर्गत कोविशिल्ड लसीची निर्मिती कंपनीनं सुरु करण्या सुरुवात केली आहे.

तर निर्यात सुरु करणार

केंद्र सरकारनं लसींची मागणी नोंदवली नाही तर आम्ही लसीचे डोस निर्यात करणार असल्याचं सीरमनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. आम्ही सरकारसोबत चर्चा करत आहोत. येत्या काही दिवसात त्यासंदर्भातील माहिती मिळेल. सीरमकडे 50 कोटी डोस आहेत. हे पुढील दोन महिन्यात वापरले जातील. यामध्ये भारत सरकारला प्राथमिकता दिली जाईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

सध्या कोविशिल्ड लसीची निर्यात कमी प्रमाणात होत आहे. पुढील आठवड्यात आम्हाला लसीसाठी ऑर्डर मिळेल. गेल्या आठ महिन्यात आम्ही निर्यात केलेली नाही, असं देखील सीरमकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Special Report | ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा समुह संसर्ग! भारतात काय होणार?

Omicron | कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण; आरोग्य विभागाचं टेन्शन वाढलं

Serum Institute of India decided to cut fifty percent covishield due to no new govt order

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.