VIDEO: ओह माय गॉड… ओ यारा… आक्रोश आणि मातम… अचानक अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. आजही कुल्लू येथे भुस्खलन झाल्याने अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या.
कुल्लू | 24 ऑगस्ट 2023 : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. कुल्लूच्या आनी उपमंडल येथे भुस्खलन झालं आहे. या भुस्खलनात एकापाठोपाठ एक अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पत्त्याच्या बंगल्यासारख्या या इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत 7 इमारती कोसळल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत असंख्य मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आक्रोश करताना दिसत आहेत. ओह माय गॉड… ओ यारा… असा आक्रोश या व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. काळजाचा ठोका चुकेल असा हा व्हिडीओ आहे.
कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँडजवळच ही दुर्घटना घडली आहे. सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. एकूण 7 इमारती जमीनदोस्त झाल्याचं सांगण्यात आलं. आनी बस स्टँडच्या जवळ इमारतींच्या मागे भुस्खलन झालं. त्यामुळे एकाचवेळी अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. व्हिडीओतून हे चित्रं दिसत आहे. नाल्याचं पाणीही इमारतीच्या पाठी पडताना दिसत आहे. भुस्खलन होताच झाडही हलताना दिसत आहे.
त्यानंतर पाहता पाहता इमारती धसायला सुरुवात होताना दिसत आहे. अन् पापणी लवते न लवते तोच इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे. काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ तयार केला आहे. इमारतीच्यावर लोक असल्याचं एक व्यक्ती व्हिडीओतून बोलताना दिसत आहे. लोक घाबरलेले दिसत आहेत. प्रशासनाने नागरिकांना या इमारती खाली करण्याच्या एक आठवड्यापूर्वीच नोटिसा दिल्या होत्या, अशी माहितीही मिळत आहे.
ओ माय गॉड… ओ यारा…
या व्हिडीओत एक तरुण पळत पळत येताना दिसत आहे. ओ माय गॉड… ओ यारा… असा आक्रोश करताना तो दिसत आहे. त्यानंतर घटनास्थळी धुळीचे लोळच लोळ दिसत आहेत. त्यामुळे काही दिसेनासे होते. हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आणि भेसूर वाटतं. हिमाचल प्रदेशात गेल्या 72 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल बुधवारीही या भागात भुस्खलन झाल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला होता. आजही या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
खबरदारी वेळीच घेतली म्हणून
भुस्खलनात जमीनदोस्त झालेल्या इमारतींमध्ये कांगडा को ऑपरेटिव्ह बँक आहे. दुसऱ्या इमारतीत एसबीआय भवन आहे. जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडणार असल्याच्या शक्यतेने प्रशासनाने या इमारतीतून या दोन्ही बँका दुसरीकडे हलविल्या होत्या.
कुल्लू के आनी में बैंक के भवन गिरे। इन्हें खाली करवा दिया गया था। #Himachaldisaster#HimachalFloods pic.twitter.com/S9j6cDv3M8
— नवनीत शर्मा-Navneet Sharma (@nsharmajagran) August 24, 2023
कोट्यवधींचं नुकसान
दरम्यान, एकमागोमाग एक असंख्य इमारती जमीनदोस्त झाल्याने काही क्षणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे. या इमारतीत काही भाडेकरूही राहत होते. पण त्यांनी वेळीच घर खाली केल्याने त्यांचा जीव वाचल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मृत आणि जखमींचा नेमका आकडा बाहेर आलेला नाही. हा आकडा मोठा असू शकतो असं सांगितलं जात आहे.