MP Sex Racket: शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींसह 3 ग्राहकांना अटक
मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये महिला शिवसेना (Shiv Sena) नेत्या अनुपमा तिवारी (Anupana Tiwari) यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 2015 साली शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.
मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये महिला शिवसेना नेत्या अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या शिवसेना नेत्याच्या घरातून पोलिसांनी महिला मॅनेजर, तीन ग्राहकांसह सहा जणांना अटक केली आहे. यासोबतच त्याच्या घरातून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या महिलेच्या घरात हे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे ती स्वत:ला सामाजिक कार्यकर्ती असल्याचं सांगते. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची पण निवडणूक लढवली आहे.
कसा झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पोलिसांना सेक्स रॅकेटची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस सिहोर बसस्थानकाजवळ असलेल्या अनुपमा घरी पोहोचले. छाप्यादरम्यान त्या ठिकाणी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिस आल्यानंतर तेथून कोणीही पळून जाण्यात यशस्वी झाले नाही. शिवसेना नेत्याच्या घरातून पोलिसांनी चार मुली आणि तीन ग्राहकांना अटक केली. यासोबतच तेथून अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. पकडलेल्या सर्व मुली भोपाळ जवळच्या रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदुलता नावाच्या महिला मॅनेजर सर्व मुलींना शिवसेना नेत्याच्या घरी पोहचवत होती.
याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी पोलिसांनी शिवसेना नेत्याच्या घरातून २८ हजार रुपयांसह दोन कारही जप्त केल्या आहेत.
कोण आहे अनुपमा तिवारी
मिळालेल्या माहितीनुसार, अनुपमा तिवारी यांनी 2015 साली शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. नेहरू युवा केंद्रातर्फे त्यांना काही वर्षांपूर्वी योगाचार्य म्हणून गौरविण्यातही आले आहे. अनुपमा यांनी एका कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक विधाने केली होती. त्यांनी महिलेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र आता त्याच्या घरातून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.
Other News