New delhi : शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाईसह राज्यसभेचे 12 खासदार निलंबीत, गेल्या अधिवेशनातल्या गोंधळामुळे कारवाई

शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पहायला मिळाला होता.  12 ऑगस्टला संसदेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत हायव्हेल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. 

New delhi : शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाईसह राज्यसभेचे 12 खासदार निलंबीत, गेल्या अधिवेशनातल्या गोंधळामुळे कारवाई
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 4:09 PM

नवी दिल्ली : अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या 12 खासदारांचं  निलंबन करण्यात आलेलं आहे. दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यावेळी ही मोठी कारवाई करण्यात आलीय. निलंबन झालेल्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, आणि तृणमूलच्या काही खासदारांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई निलंबित

शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पहायला मिळाला होता.  12 ऑगस्टला संसदेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत हायव्हेल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता.  त्या गोंधळावर सर्वत्र टीका झाल्याचंही पहायला मिळालं. त्यानंतर खासदारांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.निलंबितांमध्ये काँग्रेस, शिवसेना, तृणमूलच्या खासदारांचा समावेश आहे. गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 6 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यात शिवसेनच्या 2 खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदारांवरील कारवाईनंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसचे 6, शिवसेनेचे 2, तृणमूलचे 2 खासदार निलंबित

  1. प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना
  2. अनिल देसाई, शिवसेना
  3. फुलो देवी नेताम, काँग्रेस
  4. छाया वर्मा, काँग्रेस
  5. रिपुन बोरा, काँग्रेस
  6. राजामणि पटेल, काँगेस
  7. सैय्यद नासिर हुसेन, काँग्रेस
  8. अखिलेश प्रसाद सिंह, काँग्रेस
  9. एलामरम करिम, सीपीएम
  10. डोला सेन, तृणमूल काँग्रेस
  11. शांता छत्री, तृणमूल काँग्रेस
  12. बिनय विश्वम, सीपीआई

राज्यातही गेल्या अधिवेशनात निलंबनाची कारवाई

देशाच्या संसदेतही गेल्या अधिवेशनात मोठा ड्रामा पहायला मिळाला होता. तालिका अध्यक्षांचा माईक, खेचण्यापासून लॉबीत शिवगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भाजपच्या 14 आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेत अधिवेशनावर बहिष्कार टाकून विधान भवनाच्या बाहेर प्रतिविधानसभा सुरू केली होती. मात्र त्यावेळचे तालिका अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी मार्शल पाठवून प्रतिविधानसभाही उधळून लावली होती. आता पुन्हा राज्यातही हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे यंदाचं अधिवेशन कोणत्या मुद्द्यामुळे गाजणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Nagpur काय सांगता ऐकू न शकणारेही आता ऐकतील, 16 मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया

Video: भल्यामोठ्या झोपाळ्यावर तरुणाचे स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला जीव जास्त झालाय वाटतं!

संजय राऊतांना फार गांभीर्याने घेऊ नका, ते एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का?, फडणवीसांचा खोचक सवाल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.