धक्कादायक! इटलीवरून आलेल्या विमानातील 170 प्रवासी कोरोनाबाधित, गुरुवारीही 125 जणांचा अहवाला पॉझिटिव्ह

देशात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अमृतसरमधून आलेल्या बातमीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. पंजाबच्या अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सलग दुसऱ्या दिवशी इटलीमधून आलेल्या विमानातील अनेक प्रवासी हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत.

धक्कादायक! इटलीवरून आलेल्या विमानातील 170 प्रवासी कोरोनाबाधित, गुरुवारीही 125 जणांचा अहवाला पॉझिटिव्ह
corona
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 8:04 PM

अमृतसर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. देशात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अमृतसरमधून आलेल्या बातमीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. पंजाबच्या अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सलग दुसऱ्या दिवशी इटलीमधून आलेल्या विमानातील अनेक प्रवासी हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या बातमीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानामध्ये एकूण 285 प्रवासी होते. यातील तब्बल 170 प्रवाशांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व प्रवाशांना आता क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

गुरुवारी विमानातील 125 प्रवासी कोरोनाबाधित

दरम्यान गुरुवारी देखील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहुन आलेल्या एका विमानामधील 125 प्रवाशांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. या विमानामध्ये एकूण 170 प्रवाशी प्रवास करत होते. तर आज 285 प्रवाशांपैकी 170 प्रवाशांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व प्रवाशांना आता क्वॉरंटाईन करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार नॉइस एअरलानचे एक विमान हे इटलीहुन आज अमृतसरमध्ये दाखल झाले. नव्या नियमानुसार या सर्व प्रवाशांची टेस्ट करण्यात आली. या कोरोना टेस्टमध्ये तब्बल 170 लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

इटलीमध्ये एकाच दिवसात दोन लाख रुग्णांची नोंद

इटलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इटलीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल दोन लाख करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जगात कोरोनाची साथ आल्यापासूनचा हा इटलीमधील सर्वोच्च आकडा आहे. बुधवारी इटलीमध्ये 189,109 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी तब्बल 2 लाख 19,441 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे वाढत आहेत, मात्र दुसरीकडे इटलीमध्ये मृत्यूचे प्रमाण घटले आहे, कोरोनमुळे मृत्यू होणाऱ्यांचे सरासरी प्रमाण 232 वरून कमी होऊन 198 वर आले आहे.

संबंधित बातम्या 

Bihar Crime: बिहारमध्ये दृश्यमची पुनरावृत्ती, पत्नीच्या प्रियकराला अडकवण्यासाठी प्लॅन करुन मुलीची हत्या

‘सीबीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून एक मार्क्स पॉलिसी रद्द; विद्यार्थी, पालकांनी केले निर्णयाचे स्वागत

‘पंजाबमध्ये जीवाला धोका असल्याचं सांगणं हा राज्याचा अपमान’, नवज्योतसिंह सिद्धू यांचा भाजपवर निशाणा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.