सिद्धारमैया हेच मुख्यमंत्री, हायकमांडचा अंतिम फैसला, शपथविधीची तारीखही ठरली; डीके शिवकुमार यांच्याकडे कोणतं पद?

तब्बल चार दिवसाच्या माथापच्ची नंतर कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा पेच निकाली निघाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार शपथ घेणार आहेत.

सिद्धारमैया हेच मुख्यमंत्री, हायकमांडचा अंतिम फैसला, शपथविधीची तारीखही ठरली; डीके शिवकुमार यांच्याकडे कोणतं पद?
SiddaramaiahImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 7:27 AM

बंगळुरू : चार दिवसांच्या माथापच्चीनंतर अखेर सिद्धारमैया यांच्याकडे कर्नाटकाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. हायकमांडने सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर सिद्धारमैया हेच कर्नाटकाचे मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट केलं. तसेच डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. राज्यात काँग्रेसला प्रचंड यश मिळाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. डीके शिवकुमार यांनी तर मुख्यमंत्रीपदाशिवाय चर्चाच करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, हायकमान समोर डीके शिवकुमार बॅकफूटवर गेले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजजात बंगळुरू येथे नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. काँग्रेसने आज 18 मे रोजी पक्षाच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. बंगळुरू येथे संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ गटनेता निवडीचे फक्त सोपस्कार पार पडणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री निवडीसाठी तीन पर्यवेक्षक नेमण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी हे पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या नेत्यांनी आमदारांशी चर्चा करून दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मत कळवलं होतं.

दावा कायम ठेवला

त्यानंतर पक्षात अनेक बैठका झाल्या होत्या. खरगे यांनी पक्षाच्या कार्यकारी नेत्यांशी चर्चा केल्या. त्यानंतर अखेरचा निर्णय घेतला. बुधवारी संध्याकाळी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेसने ट्विटरवर या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधींसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यात राहुल गांधी यांना जननायक संबोधण्यात आले होते. यापूर्वी रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया बसणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे डीके शिवकुमारच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, सिद्धारमैया यांनी मुख्यमंत्रीपदावरील दाव्यातून माघार घेण्यास नकार दिला होता.

अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला

दरम्यान, सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांच्या बैठकीत अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, आता सिद्धारमैया किती वर्षासाठी मुख्यमंत्री राहतील याचा सस्पेन्स कायम आहे. शिवाय डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह आणखी कोणती खाती मिळणार हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच डीकेंकडे प्रदेशाध्यक्षपद राहणार का? याचंही गूढ कायम आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.