Delhi Crime: बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या; भर बाजारात केले वार

वास्तविक, हत्येतील आरोपीच्या बहिणीवर मृत व्यक्तीचे प्रेम होते. शाहरुख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो आरोपीच्या बहिणीवर प्रेम करीत होता. शाहरुख काही दिवसांपूर्वीच डासना तुरुंगातून बाहेर आला होता. तो तुरुंगातून बाहेर आल्यापासून आरोपी तरुणाच्या विवाहित बहिणीचा छळ करत होता.

Delhi Crime: बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या; भर बाजारात केले वार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 10:50 PM

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीच्या सीमापुरी भागात काही लोकांनी भर बाजारपेठेत एका व्यक्तीवर चाकूने वार केले. या चाकू हल्ल्याच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुरुवातीला मारेकरी चाकूने वार करीत असल्याचे पाहून तेथील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. इतके लोक मिळून एका व्यक्तीची हत्या का करताहेत हे लोकांना समजत नव्हते. परंतु काही तासांतच हत्येच्या घटनेचा उलगडा झाला. हल्लेखोरांनी बिनदिक्कतपणे केलेल्या हत्येच्या धाडसाने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

मृत तरुणाचे आरोपीच्या बहिणीवर होते प्रेम

वास्तविक, हत्येतील आरोपीच्या बहिणीवर मृत व्यक्तीचे प्रेम होते. शाहरुख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो आरोपीच्या बहिणीवर प्रेम करीत होता. शाहरुख काही दिवसांपूर्वीच डासना तुरुंगातून बाहेर आला होता. तो तुरुंगातून बाहेर आल्यापासून आरोपी तरुणाच्या विवाहित बहिणीचा छळ करत होता. दिल्लीतील शाहदरा भागातील सीमापुरी येथे बहिणीच्या प्रेमात पडल्याच्या कारणावरून भावाने बाजाराच्या मध्यभागी चाकूने वार करून तरुणाची हत्या केली.

बहिणीचे लग्न मोडले म्हणून भावाने उचलले हे पाऊल

या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलिसांचे म्हणणे आहे की, शाहरुखचे हत्येतील आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधामुळे आरोपीच्या बहिणीचा संसार मोडला होता. त्याच रागातून आरोपीने बहिणीच्या प्रियकरावर चाकूने वार करून हत्या केली. बुधवारी सायंकाळी आरोपी जुबेर याने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने बहिणीच्या संसारात विघ्न ठरलेल्या शाहरुखला भर बाजारपेठेत अडवले आणि त्याच्यावर चाकूने अनेक वार करून पळ काढला होता. या घटनेचा पोलिस कसून तपास करीत आहेत. (Sister’s boyfriend killed by brother in Delhi)

इतर बातम्या

Uttar Pradesh: कोंबडा न दिल्याच्या रागातून व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; जमावावर अंदाधुंद गोळीबार

Ichalkaranji : शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.