तारीख पे तारीख ! सोनियाच अध्यक्ष रहाणार, नव्या काँग्रेस अध्यक्षासाठी नवी तारीख

सोनिया गांधी याच पुढील वर्षापर्यंत काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुका होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसला पुढील वर्षी नवा अध्यक्ष मिळेल आणि तो पूर्ण पाच वर्षे काम करेल.

तारीख पे तारीख ! सोनियाच अध्यक्ष रहाणार, नव्या काँग्रेस अध्यक्षासाठी नवी तारीख
काँग्रेस कार्यकारिणी बैठक
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 2:54 PM

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी पुढील वर्षभर सोनिया गांधी यांच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुका सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होतील. अशावेळी सोनिया गांधी याच पुढील वर्षापर्यंत काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुका होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसला पुढील वर्षी नवा अध्यक्ष मिळेल आणि तो पूर्ण पाच वर्षे काम करेल. (Sonia Gandhi retains Congress presidence, Organizational elections in Congress will be held in September 2022)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी सातत्याने निवडणुकीची मागणी केली आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असतील तर त्यांना अध्यक्ष करण्यात यावं अशीही मागणी केली जात आहे.

काँग्रेसच्या 23 नेत्यांचं सोनियांना पत्र

काँग्रेसच्या एकूण 23 नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. “काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. सध्या पक्षाला पूर्ण वेळ देईल अशा नेतृत्त्वाची गरज आहे. त्याने लोकांना भेटावे, कोणताही विषय असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करता यावी, त्याने पक्ष संघटनाला वेळ द्यावा. भाजपचा वाढता विस्तार आणि तरुणांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत आहे. त्यामुळे तातडीने तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता आहे.” अशी भूमिका त्या पत्रात व्यक्त करण्यात आली होती. त्या पत्रावरुन सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना सुनावलं

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या ‘जी-23’च्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधलाय. ‘मी पक्षाची स्थायी अध्यक्ष आहोत. माझ्याशी संवाद साधण्यासाठी माध्यमांचा आधार घेण्याची गरज नाही, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्याचबरोबर 30 जूनपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. मात्र, कोरोना महामारीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि आता त्याती रुपरेषा लवकरच सादर केली जाईल, असंही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय.

पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आपल्यासमोर अनेक आव्हानं येतील. मात्र, आपण एकजूट आणि शिस्तीने राहिलो, तसंच पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रिय केलं तर मला पूर्ण विश्वास आहे की आपण चांगली कामगिरी करु’. तसंच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील विघानसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, नितेश राणेंना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Mumbai Drugs Case : नवाब मलिकांचा फ्लेचर पटेलांचा उल्लेख, आता पटेलांचं प्रत्युत्तर काय?

Sonia Gandhi retains Congress presidence, Organizational elections in Congress will be held in September 2022

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.